पुण्याच्या जवळ बनवत होते पॉर्न व्हिडीओ, पोलिसांनी छापा टाकल्यावर पळापळ

Pune News | लोणावळामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोणावळ्यात पॉर्न व्हिडीओ तयार करण्यात येत होता. मात्र वेळीच या टोळीला अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोणावळ्यामधील व्हीलावर हा सर्व प्रकार सुरू होता.

या ठिकाणी विविध राज्यांतून काही तरुण आणि तरुणी एकत्र आले होते. ते येथे पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. यातील काही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या टोळीतील 15 पैकी 13 जणांना अटक केली आहे.

लोणावळ्यात पॉर्न व्हिडीओ करणारी टोळी अटकेत

पॉर्न व्हिडीओ करण्यावर कायद्याने बंदी असतानाही वेगवेगळ्या अश्लील ओ.टी.टी प्लॅटफॉर्मसाठी काही तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील व्हीलावर हे कृत्य करत होते. या घटनेची माहिती मिळताच त्याची दखल घेण्यात आली.

यामुळे एकच (Pune News) संताप व्यक्त करण्यात येत आहे. या कृत्यामध्ये 15 पैकी पाच तरुणींचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व तरुण आणि तरुणी भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी व्हीलावर छापा टाकला.

अश्लील OTT प्लॅटफॉर्मसाठी करत होते व्हिडीओ

लोणावळा (Pune News) ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावरून पॉर्न व्हिडीओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य जप्त केले आहेत. पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. या संदर्भात लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देत असतात. याठिकाणी हिल स्टेशन असल्याने येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. अशात ही घटना समोर आली आहे. त्यामुळे या घटनेची आता एकच चर्चा रंगली आहे.

News Title : Pune News 13 Porn Video Makers Arrested By Police in Lonavala 

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांची भरती

लोकसभेसाठी ठाकरे गटाच्या ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर

मऊ आणि गुलाबी ओठांसाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!

‘बदनामी नको म्हणून..’, एक्स-गर्लफ्रेंडबाबत सलमानचा मोठा खुलासा

लखनऊ विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक, आज पंजाबविरुद्ध रंगणार सामना