मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका बदलली, नव्या भूमिकेमुळे कोणत्या पक्षाला होणार फायदा?

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांनी राजकारण्यांना धडा शिकवण्याचा विडा उचलला होता, त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढवण्याची घोषणा केली होती. आधी प्रत्येक गावातून मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरुन यंत्रणा अपुरी पाडण्याचं बोललं जात होतं. मात्र नंतर मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक उमेदवार देण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. अखेर आपला हा निर्णय सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बदलला आहे आणि लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.

लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात गावोगावच्या मराठ्यांकडून मनोज जरांगे पाटील यांनी अहवाल मागवले होते, मात्र मिळालेल्या अहवालांमुळे मनोज जरांगे पाटील नाराज झाले आहेत. या अहवालांच्या आधारे आपल्याला निर्णय घेता येणार नाही. मला मराठा समाजाची फसवणूक करायची नाही, त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. मात्र हा निर्णय जाहीर करत असताना त्यांनी ज्याला पाडायचं त्याला पाडा, तसेच मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारांना निवडून द्या, असं आवाहन मराठा समाजाला केलं आहे.

महायुती की महाविकास आघाडी कुणाला फायदा?

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नव्या भूमिकेची आता राज्याच्या राजकारणात तसेच मराठा समाजात मोठी चर्चा होऊ लागली आहे. जरांगे पाटलांच्या या भूमिकेचा फायदा होणार तरी कुणाला?, असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. यासंदर्भात खालील काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

मनोज जरांगे पाटलांच्या आधीच्या भूमिकांमुळे मराठा समाजाची बहुतांश मतं महाराष्ट्रात सध्या अस्तिस्तात असलेल्या दोन्ही युत्या-आघाड्यांना पडणार नव्हती. या मतांचा फटका नेमका कुणाला बसणार याबद्दल वेगळे तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र आता मराठा समाजाचा (Maratha) उमेदवारच नसल्याने मराठा समाजाला दोन्ही युत्या-आघाड्यांपैकी एकाला मतदान करण्याचा अधिकार असणार आहे, याशिवाय अपक्ष तसेच इतरांना सुद्धा ते मतदान करु शकतात.

जरांगे पाटलांच्या नव्या भूमिकेचा फायदा कोणाला?

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाचा लढा सुरु केला तेव्हा त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध किंवा पाठिंबा नव्हता. ते कुणाबद्दलही वाईट शब्दात बोलले नव्हते. मात्र वाशीतून विजयी गुलाल उधळून माघारी फिरल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या पदरी घोर निराशा पडली त्यानंतर त्यांचा सरकारबद्दलचा सूर पालटून गेला. विशेषतः उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी कायमच आपल्या निशाण्यावर ठेवलं. महायुतीच्या (Mahayuti) सरकारवर त्यांनी अत्यंत धक्कादायक आरोप केले.

गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी अनेक टोकदार विधानं महायुतीबद्दल तसेच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याबद्दल केली आहेत. त्यामुळे एक प्रकारे त्यांचे समर्थक सुद्धा महायुती तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उभे ठाकले होते. याचाच फायदा महाविकास आघाडीला(Maha Vikas Aghadi) होऊ शकतो. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचं चित्र आहे. त्यामुळे याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होऊ शकतो. अप्रत्यक्षपणे मराठा समाजाची मतं महाविकास आघाडीच्या बाजूनं जाऊ शकतात, असं मानलं जात आहे.

News Title: Manoj Jarange Patils decision for whose benefit

[Manoj Jarange Patil, Loksabha Election 2024, Mahayuti, Maha Vikas Aghadi, Devendra Fadnavis]

या बातम्या सुद्धा वाचा-

लोकसभेला कुणाला मतदान करायचं?, मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

जरांगे पाटलांची लोकसभा निवडणुकीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्या-

Pune News: लोणावळ्यात एका बंगल्यात 15 तरुण-तरुणी, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक माहिती उघड

धक्कादायक!!! “अजित पवारांनी केलेल्या सर्व्हेत सु्प्रिया सुळे आघाडीवर, इतक्या मतांनी होतील विजयी”

‘मला माहिती नसताना…’; छगन भुजबळ यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!