Mayank Yadav | आयपीएलच्या सतराव्या हंगामात युवा खेळाडू आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित करत आहेत. शनिवारी लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज (LSG vs PBKS) यांच्यात सामना झाला. एका सामन्याचा अपवाद वगळता अद्याप आयपीएलच्या यंदाच्या हंगामात यजमानांचा बोलबाला राहिला. पंजाबविरूद्धच्या सामन्यात लखनौकडून 21 वर्षीय मयंक यादवने (Who Is Mayank Yadav) कमाल केली. त्याने आयपीएल 2024 मधील सर्वात जलद चेंडू टाकला. त्याने 3 बळी घेत पदार्पणाचा सामना गाजवला. (IPL 2024 News)
मयंक यादवने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद गतीने चेंडू टाकला. त्याने 155.8 किमी प्रति ताशी वेगाने चेंडू टाकून सर्वांनाच धक्का दिला. त्याने त्याच्या 4 षटकांत 27 धावा देत 3 बळी घेतले. मयंकने आपल्या पहिल्याच षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघ चांगली कामगिरी करत असताना तो त्यांच्यासाठी काळ ठरला. अखेर लखनौने 21 धावांनी विजय मिळवून विजयाचे खाते उघडले.
IPL 2024 चा थरार
मयंक यादवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिला चेंडू 147.1 किमी प्रति ताशी वेगाने टाकला. यानंतर त्याने 4 षटकातील 9 चेंडू 150 किमी प्रति ताशी वेगापेक्षा जास्त गतीने टाकले. लक्षणीय बाब म्हणजे त्याच्या सर्वात स्लो चेंडूचा वेग हा 141 किमी प्रति ताशी होता. या वेगापर्यंतही पोहोचताना अनेकांना घाम फुटतो.
मयंक यादवचा जन्म 17 जून 2002 मध्ये दिल्लीत झाला. मयंक दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने येथील सोनेट क्लबमध्ये क्रिकेटचे धडे घेतले. ही तिच अकादमी आहे, जिथून भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत, शिखर धवन आणि आशिष नेहरा यांसारखे स्टार तयार झाले. मयंक यादवने त्याच्या देशांतर्गत कारकिर्दीत आतापर्यंत 1 प्रथम श्रेणी आणि 10 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत.
Make that 3️⃣ wickets on debut 👏#PBKS require 60 from 24 deliveries
Follow the Match ▶️ https://t.co/HvctlP1bZb #TATAIPL | #LSGvPBKS https://t.co/yuDIu6arP5
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024
Mayank Yadav कोण आहे?
मयंक यादव एक सामान्य कुटुंबातून येतो. त्याने मेहनतीच्या जोरावर आयपीएलसारख्या प्रसिद्ध लीगमध्ये स्थान मिळवले. माहितीनुसार, कोरोना काळात त्याच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले होते. क्रिकेटचे साहित्य खरेदी करण्यासाठी देखील त्याला संघर्ष करावा लागला.
लखनौ सुपर जायंट्सने मयंकला आयपीएल 2022 च्या लिलावादरम्यान आपल्या संघात घेतले. मयंक यादव 20 लाख रूपयांच्या मूळ किंमतीसह लिलावाच्या रिंगणात होता. लखनौने त्याला त्याच्या मूळ किंमतीत खरेदी केले. पण, आयपीएल 2023 मध्ये तो दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकला. त्याच्या जागी अर्पित गुलेलियाला संघात स्थान मिळाले होते. आता तोच मयंक पदार्पणाचा सामना खेळताच स्टार झाला.
News Title- Mayank Yadav of Lucknow Super Giants bowled fastest in IPL 2024
महत्त्वाच्या बातम्या –
बारामतीतून अखेर अजित पवार गटाचा उमेदवार ठरला, सुनील तटकरेंनी केली घोषणा
“जेव्हा ते धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत होते…”, आर. अश्विन हार्दिकच्या बाजूने मैदानात!
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; पाहा कुणा-कुणाला मिळालं तिकीट?
पुण्याच्या जवळ बनवत होते पॉर्न व्हिडीओ, पोलिसांनी छापा टाकल्यावर पळापळ
मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका बदलली, नव्या भूमिकेमुळे कोणत्या पक्षाला होणार फायदा?