नोव्हेंबरमध्ये राजीनामा अन् पुन्हा बाबरची एन्ट्री, आफ्रिदीची हकालपट्टी; PCB चा मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Babar Azam | पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) कधी कोणता निर्णय घेईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात भूकंप झाला. पीसीबीने संपूर्ण निवड समिती बरखास्त केली. यासह कर्णधार बाबर आझमला देखील हे पद सोडण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर शान मसूदला कसोटी तर शाहीन शाह आफ्रिदीला ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. शाहीनच्या नेतृत्वात पाकिस्तानने केवळ एकच मालिका खेळली, ज्यात शेजाऱ्यांना 1-4 असा पराभव पत्करावा लागला.

भारतात झालेल्या वन डे विश्वचषकात पाकिस्तानला अफगाणिस्तानकडून देखील पराभव स्वीकारावा लागला होता. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत ट्वेंटी-20 आणि वन डे संघाच्या कर्णधारपदी पुन्हा एकदा बाबर आझमच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत मोहम्मद रिझवानचे नाव देखील आघाडीवर होते. पण, बोर्डाने बाबरवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

PCB चा मोठा निर्णय!

शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात पाकिस्तानने न्यूझीलंडविरूद्ध एकमेव मालिका खेळली. आगामी काळात न्यूझीलंडचा संघ ट्वेंटी-20 मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. बाबरने 15 नोव्हेंबर 2023 रोजी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. याला पाच महिने देखील पूर्ण झाले नाहीत. तोच बाबर पुन्हा एकदा कर्णधार झाला आहे.

विशेष बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले इमाद वसिम आणि मोहम्मद आमिर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या जर्सीत दिसणार आहेत. बोर्डाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा माघारी दिला आहे. त्यामुळे हे दोघेही ट्वेंटी-20 विश्वचषकात दिसतील यात शंका नाही.

 

Babar Azam पुन्हा कर्णधार

अलीकडेच पाकिस्तानी खेळाडूंनी फिटनेस कॅम्पमध्ये हजेरी लावली. पाकिस्तानचे खेळाडू आर्मी स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी गेले. तेथे खेळाडूंनी फिटनेस कॅम्पमध्ये सहभाग नोंदवत प्रशिक्षणाचे धडे घेतले. भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात भूकंप पाहायला मिळाला. पीसीबी अध्यक्षांसह कर्णधार आणि प्रशिक्षक बदलण्यात आला. जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक होणार आहे.

आता पुन्हा एकदा पाकिस्तानचा संघ बाबर आझमच्या नेतृत्वात ट्वेंटी-20 विश्वचषक खेळणार आहे. बाबर हा एकमेव असा कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषकात भारताचा पराभव केला. बाबरच्याच नेतृत्वात शेजाऱ्यांनी मागील विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता. पण त्यांना इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला.

News Title- Babar Azam reappointed as the captain of Pakistan cricket team ahead of t20 world cup 2024
महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2024 मध्ये जलद चेंडू टाकणारा वेगाचा बादशाह; कोण आहे 21 वर्षीय मयंक यादव?

बारामतीतून अखेर अजित पवार गटाचा उमेदवार ठरला, सुनील तटकरेंनी केली घोषणा

“जेव्हा ते धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत होते…”, आर. अश्विन हार्दिकच्या बाजूने मैदानात!

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; पाहा कुणा-कुणाला मिळालं तिकीट?

पुण्याच्या जवळ बनवत होते पॉर्न व्हिडीओ, पोलिसांनी छापा टाकल्यावर पळापळ