आयपीएलमुळे एकाचा बळी; अत्यंत धक्कादायक घटना समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना, देशामध्ये आयपीएलचा (IPL 2024) थरार सुरू आहे. कोणी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत आहे तर कोणी चेन्नई सुपरकिंग्जला सपोर्ट करत आहे. यंदाची आयपीएल 2024 (IPL 2024) अनेक कारणांनी चर्चेत आली. रोहित शर्माचे कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याला संघाची धुरा संभाळायला दिली. यामुळे पांड्यावर चाहते संतापले आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना आयपीएलमुळे घडली आहे. कोल्हापूरमध्ये रोहित शर्मा बाद झाल्यानंतर एकानं जल्लोष केला म्हणून त्याला जबर मारहाण केली. त्याचा मृत्यू झाला. (IPL 2024)

नेमकं काय घडलं?

कोल्हापूरमधील हणमंतवाडी (ता. कारवीर) येथे बुधवारी रात्री घटना घडली आहे. बुधवारी 27 मार्चच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बंडू तिबिले, सागर झांजगे आणि बळवंत झांजगे आयपीएलचा सामना पाहत होते. मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज असा सामना सुरू असताना रोहित शर्मा बाद झाला. (IPL 2024)

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर बंडूपंत तिबिलेनं आनंद साजरा केला. सागर झांजगे आणि बळवंत झांजगे यांना त्याचा राग अनावर झाला. बंडूपंत तिबिलेला त्यांनी दांडक्याने जबर मारहाण केली. त्यावेळी कानातून रक्तप्रवाह सुरू होता. बंडूपंत जखमी झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

क्रिकेटप्रेमीची हत्या

बंडूपंतला कोल्हापूरच्या स्थानिक रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यावेळी त्याच्यावर जवळपास तीन दिवस उपचार सुरू होते. तीन दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. बंडूपंत यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, मुलगा, नातवंडे, भाऊ-बहिण असा मोठा परिवार होता.

संशयित आरोपी म्हणून सागर झांजगे आणि बळवंत झांजगे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्यांना अटक केली. यामुळे कोल्हापूरमधील क्रिकेट प्रेमींना चांगलाच धक्का बसला आहे.

आयपीएलमुळे चाहते आपापल्या खेळाडूंनुसार विभक्त होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतंय. कोल्हापूरमध्ये खेळाचा आनंद घेण्याऐवजी एका क्रिकेटप्रेमींची हत्या झाली. यामुळे कोल्हापूरमध्ये या हत्येनं खळबळ माजली.

News title – IPL 2024 In Crime News At Kolhapur

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीतून अखेर अजित पवार गटाचा उमेदवार ठरला, सुनील तटकरेंनी केली घोषणा

“जेव्हा ते धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत होते…”, आर. अश्विन हार्दिकच्या बाजूने मैदानात!

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; पाहा कुणा-कुणाला मिळालं तिकीट?

पुण्याच्या जवळ बनवत होते पॉर्न व्हिडीओ, पोलिसांनी छापा टाकल्यावर पळापळ

मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका बदलली, नव्या भूमिकेमुळे कोणत्या पक्षाला होणार फायदा?