फक्त अशी घरं पाहून मारायचे डल्ला, मुंबईच्या चोरट्यांची पुण्यातल्या घरांवर वक्रदृष्टी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुणे शहर (Pune News) हे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये राज्यात अव्वल स्थानावर आल्याचं बोललं जात आहे. खून, गोळीबार, दिवसाढवळ्या चोरी अशा अनेक घटना पुण्यात घडत आहेत. अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली आहे. मुंबईतील काही चोर कॅबच्या माध्यमातून पुण्याला यायचे आणि पुण्यातील घरं फोडून चोऱ्या करायचे अशी माहिती समोर आली आहे.

चोर चोऱ्या करण्यासाठी स्पेशल कॅबचा वापर करत एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जात घरफोडी करताना दिसत आहे. चोरी करण्यासाठी चोरटे मुंबईतून पुणे शहरामध्ये (Pune News) आले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील सकाळनगर बाणेर परिसरामध्ये 23 मार्च रोजी दोन ठिकाणी घरफोडी झाली आहे. याबाबत चतुश्रुंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून ही घरफोडी करण्यात आली. ही चोरी मुंबईत राहणाऱ्या चोरट्यांनी केली असल्याची माहिती समोर आली.

मुंबईमधील चोर असल्याची माहिती समोर येताच नालासोपारा येथून पोलिसांनी घरफोड्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दोघांची चौकशी केली. त्यावेळी घरफोडी केल्याची चौकशी समोर आली आहे. ही माहिती पोलीस आयुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजय कुलकर्णी, गुन्हे निरिक्षक युवराज नांद्रे यांच्या नेतृत्त्वाखाली इतर काही पथकांनी शोध घेतला.

चोरीचा माल पोलिसांनी केला जप्त

मोहम्मद रईस आहद शेख (वय. 37 रा, मालवणी, मुंबई) मोहम्मद रिजवान हनीफ शेख (रा. जोगेश्वरी, पूर्व मुंबई) घरफोडी करणाऱ्यांची नावं असून 30 तोळे सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल, गुन्हा करताना वापरलेलं साहित्य, असा 20 लाख 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघेही घरफोडीसाठी मुंबई टू पुणे असा कॅबने प्रवास करत होते. (Pune News)

मुंबई-पुणे कॅबने प्रवास

आरोपी मुंबई ते पुणे कॅबने प्रवास करत होते. घरफोड्या केल्यानंतर ते पुणे स्टेशनवरून पळूण जायचे. अनेक दिवसांपासून ते पोलिसांना गुंगारा देत मोहम्मद रईस हा सराईत चोरटा आहे. त्याच्यावर चोरीचे 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद रिजवान हा देखील चोर असून त्याच्यावरही एकूण सहा गुन्हे दाखल होते. (Pune News)

चोरी करायची अतरंगी टीप्स

पुण्यात गेल्यानंतर ते भाड्याच्या रिक्षाने प्रवास करत आणि प्रवास करत असताना पता भूल गये हैं जरा बताईये, असं म्हणत मराठी सोसायट्यांची दोघेजण माहिती काढत असत. शक्यतो रिक्षावाल्याला चार मजली जून्या इमारती कुठे आहेत? याबाबत विचारत आणि माहिती काढून घेत. दिवसा परिसरामध्ये जात बंद घरं पाहून चोरी करायचे. अशावेळी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते कैद झाले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

News Title – Pune News Mumbai To Pune Stolen 30 Tolas Gold

महत्त्वाच्या बातम्या

आयपीएलमुळे एकाचा बळी; अत्यंत धक्कादायक घटना समोर

‘या’ 5 लोकांशी ठेवू नका जास्त मैत्री, अन्यथा…

नोव्हेंबरमध्ये राजीनामा अन् पुन्हा बाबरची एन्ट्री, आफ्रिदीची हकालपट्टी; PCB चा मोठा निर्णय!

IPL 2024 मध्ये जलद चेंडू टाकणारा वेगाचा बादशाह; कोण आहे 21 वर्षीय मयंक यादव?

बारामतीतून अखेर अजित पवार गटाचा उमेदवार ठरला, सुनील तटकरेंनी केली घोषणा