पांड्याला ट्रोल केल्यास कारवाई होणार? मुंबई क्रिकेट असोसिएशननं सांगितलं सत्य

Mumbai Indians | मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला हल्ली चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या फ्रँचायझीने रोहित शर्माला काढून हार्दिकवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. हार्दिकला कर्णधार केल्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केला. (Hardik Pandya Troll) सोशल मीडियाच्या माध्यमातून पांड्यावर टीका होत आहे, त्याची खिल्ली उडवली जात आहे. मुंबईने आपला सलामीचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला. इथे हार्दिक पांड्याला चाहत्यांनी ट्रोल केले, त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. (IPL 2024 News)

खरं तर मुंबईला आपल्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी मुंबईला पराभवाची धूळ चारली. दोन्हीही सामन्यांमध्ये हार्दिकचे टीकाकार दिसले. अशातच हार्दिकवर टीका केल्यास अथवा त्याच्याविरोधात घोषणा दिल्यास कारवाई केली जाईल, अशा बातम्या काही माध्यमांनी प्रसारित केल्या. यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हार्दिकवर चाहत्यांकडून टीका

मुंबई इंडियन्सचे पुढील चार सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. सोमवारी मुंबई आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. मुंबई आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे, तर राजस्थान विजयाची हॅटट्रिक मारण्यासाठी प्रयत्नशील असेल. वानखेडेवर हार्दिकला ट्रोल केल्यास संबंधित प्रेक्षकाला थेट मैदानाबाहेर काढले जाईल, अशा सूचना मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिल्या असल्याची चर्चा होती. मात्र हे सर्वकाही खोटे असल्याचे एमसीएने स्पष्ट केले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने सांगितले की, सोमवारी होणाऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याविरोधात घोषणा देणाऱ्या प्रेक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात केले जाणार असल्याच्या बातम्या फिरत असून हे वृत्त खोटे आहे. ही केवळ अफवा असून मुंबई क्रिकेट असोसिएशन प्रेक्षकांच्या वर्तनावर बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करेल.

Mumbai Indians चे वानखेडेवरील सामने

मुंबई विरूद्ध राजस्थान (1 एप्रिल 2024)
मुंबई विरूद्ध दिल्ली (7 एप्रिल 2024)
मुंबई विरूद्ध आरसीबी (11 एप्रिल 2024)
मुंबई विरूद्ध चेन्नई (14 एप्रिल 2024)

दरम्यान, मुंबई इंडियन्सला आपल्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुबंईला पराभवाची धूळ चारली तर बुधवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विक्रमी धावसंख्या उभारून ऐतिहासिक विजय मिळवला. हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 3 बाद तब्बल 277 धावा केल्या आणि या धावांचा बचाव करताना 31 धावांनी विजय साकारला.

News Title- mumbai cricket association Mumbai Indians next 4 matches at wankhede stadium
महत्त्वाच्या बातम्या –

फक्त अशी घरं पाहून मारायचे डल्ला, मुंबईच्या चोरट्यांची पुण्यातल्या घरांवर वक्रदृष्टी

“राहुल गांधींनी चित्रपट पाहावा, मी स्वतः माझ्या खर्चाने थेअटर बुक करेन”

आयपीएलमुळे एकाचा बळी; अत्यंत धक्कादायक घटना समोर

‘या’ 5 लोकांशी ठेवू नका जास्त मैत्री, अन्यथा…

नोव्हेंबरमध्ये राजीनामा अन् पुन्हा बाबरची एन्ट्री, आफ्रिदीची हकालपट्टी; PCB चा मोठा निर्णय!