मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या बँकेत मोठा घोटाळा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bank Scam | बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी माहिती समोर आली आहे. आणखी एका बँकेतून पैशाचा मोठा अपहार झाला आहे. नांदुरा अर्बन बँकेत असणाऱ्या कर्मचाऱ्याने कोट्यवधींचा गंडा (Bank Scam) घातला आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. कनिष्ठ संगणक कर्मचाऱ्याने 5 कोटी 45 लाख रूपयांचा गंडा (Bank Scam) घातला आहे.

या प्रकऱणामध्ये नांदुरा पोलीस ठाण्यामध्ये अटक करण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संगणक अधिकाऱ्याने गंडा घातलेली रक्कम विविध बँक खात्यावर ट्रान्सफर केली आहे. या घटनेनं जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून ठेवीदारांमध्ये भितीचं वातावरण आहे. (Bank Scam)

आरोपीचं नाव गजानन शर्मा

बँकेतील इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने संगणक अधिकारी गजानन शर्मा असं आरोपीचं नाव आहे. बँकेत कोट्यवधी रूपयांचा अपहार केला आणि ते पैसे बँकेच्या विविध खात्यांवर पाठवले. ही बाब संचालक यांच्या लक्षात येताच शर्माविरोधात नांदुरा येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि अटक केलंय.

ठेविदारांमध्ये भितीचं वातावरण

घडलेल्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील नांदुरा अर्बन बँकेत ठेवीदार असणाऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. ठेवीदारांनी बँकेत गर्दी केली. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापनेवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. यावेळी बँकेनं ठेविदारांना धीर दिला आहे.

कोणीही घाबरून जाऊ नये असं ठेविदारांनी सांगितलं आहे. ठेविदारांच्या ठेवी सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया बँकेच्या व्यवस्थापकाने दिली आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये भितीचं वातावरण आहे.

News Title – Bank Scam in Buldhana Junior Employee Bank Scam Of 5 crore

महत्त्वाच्या बातम्या

फक्त अशी घरं पाहून मारायचे डल्ला, मुंबईच्या चोरट्यांची पुण्यातल्या घरांवर वक्रदृष्टी

“राहुल गांधींनी चित्रपट पाहावा, मी स्वतः माझ्या खर्चाने थेअटर बुक करेन”

आयपीएलमुळे एकाचा बळी; अत्यंत धक्कादायक घटना समोर

‘या’ 5 लोकांशी ठेवू नका जास्त मैत्री, अन्यथा…

नोव्हेंबरमध्ये राजीनामा अन् पुन्हा बाबरची एन्ट्री, आफ्रिदीची हकालपट्टी; PCB चा मोठा निर्णय!