यंदाची निवडणूक जिंकणार का?, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Supriya Sule | आगामी लोकसभा निवडणुकीचं घोडेमैदान फार लांब राहिलं नाही. महाविकास आघाडीतून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना अधिकृतरित्या उमेदवारी मिळाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील बारामती लोकसभा निवडणूक लढणार आहेत. यामुळे नणंद आणि भावजय असा मुकाबला होणार आहे. यापार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना माध्यमांनी यंदाची निवडणूक जिंकणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उत्तर दिलं आहे. (Supriya Sule)

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी दिल्यानं इंडिया आघाडीचे आभार मानले. तसेच बारामती लोकसभेतील मतदारांनी पुन्हा एकदा निवडून द्यावं अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावेळी बोलत असताना त्यांना माध्यमांनी प्रश्न केला. यंदाची निवडणूक जिंकणार का? त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “ही विचारांची लढाई आहे. मी कोणावरही वैयक्तिक टीका केलेली नाही.”

“महागाई, बेरोजगारी, दडपशाही विरोधात माझी लढाई असणार आहे. देशाच्या धोरणांचं राजकारण आहे. धोरणात्मक काम आहे. माझं लोकसभेतील काम देशानं पाहिलं आहे. मला पुन्हा संधी मिळाली आहे. माझं मेरिट पाहून मतदान करा,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यावर सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

“मोठ्या भावाची बायको ही आईसमान”

सुप्रिया सुळे यांच्या उमेदावारीची अधिकृत माहिती समोर येताच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी देखील सुनेत्रा पवार यांच्या अधिकृत उमेदवारीवर भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि भाजपवर भाष्य केलं आहे. “भाजपला निवडणूक लढवण्यासाठी आमचं घर फोडून उमेदवार द्यावा लागत आहे. मोठ्या भावाची बायको ही आईसमान असते. आमच्या आईंना निवडणुकीत उतरवून निवडणूक लढवावी लागते. हे किती दुर्दैवं आहे. हेच भाजपचं राजकारण आहे.”

“मोदी सरकार हे लोकशाही विरोधात दडपशाही करू लागले आहे. लोकशाही अडचणीत आली तर कितीही किंमत मोजावी लागली तर त्यांच्याविरोधात आम्ही लढू,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या असून त्यांनी अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेचा निषेध केला.

गणपत गायकवाड प्रकरण आणि फडणवीस टार्गेट

“गुन्हेगारी वाढली आहे. सत्तेत असलेले आमदार पोलीस ठाण्यामध्ये जात गोळीबार करतात. अशावेळी सरकार काय आदर्श देतंय. जेव्हा देवेंद्र फडणवीस देशात गृहमंत्री होतात तेव्हा देशात गुन्हेगारी वाढते असा डेटा सांगतो,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

News Title – Supriya Sule Against Sunetra Pawar At Baramati Lok Sabha Election

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 मध्ये जलद चेंडू टाकणारा वेगाचा बादशाह; कोण आहे 21 वर्षीय मयंक यादव?

बारामतीतून अखेर अजित पवार गटाचा उमेदवार ठरला, सुनील तटकरेंनी केली घोषणा

“जेव्हा ते धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत होते…”, आर. अश्विन हार्दिकच्या बाजूने मैदानात!

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; पाहा कुणा-कुणाला मिळालं तिकीट?

पुण्याच्या जवळ बनवत होते पॉर्न व्हिडीओ, पोलिसांनी छापा टाकल्यावर पळापळ