‘आम्ही मित्रच…’; अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Amabadas Danve Meet Kaire | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राज्याच्या राजकारणामध्ये ट्वीस्ट घडताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार यांच्यात मनोमिलन झालं आहे. अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे (Amabadas Danve Meet Kaire) यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे (Amabadas Danve Meet Kaire) यांना पेढा भरवला. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली आहे.

“दोघेही आम्ही मित्रच आहोत”

खैरे आणि दानवे यांच्या भेटीनंतर (Amabadas Danve Meet Kaire) अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “वाद होते पण वैचारिक हक्काचे वाद होते. आता एकत्र काम करू आणि जिंकू देखील दोघेही आम्ही मित्रच आहोत. फक्त आम्ही आमच्या अपेक्षा दाखवल्या आहेत,” (Amabadas Danve Meet Kaire)

खैरे यांना उमेदवारी दिल्यानं दानवे नाराज?

छत्रपती संभाजीनगर ही जागा शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीच्या बाजूने आली. या जागेवरून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मात्र याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे इच्छूक होते. त्यांनी आपली इच्छा उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती.

पेढा भरवून चर्चांना पूर्णविराम

या मतदारसंघातून खैरे यांना तिकीट जाहीर झालं. यामुळे अंबादास दानवे यांना तिकीट न मिळाल्याने अंबादास दानवे नाराज झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र आज दानवे यांनी खैरे यांची भेट घेतली असून चर्चांवर पूर्णविराम दिला आहे.

अंबादास दानवे यांना छत्रपती संभाजीनगरची जागा न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात आज भेट झाली आणि खैरे यांनी अंबादास यांना पेढा देखील चारला.

News Title – Amabadas Danve Meet Kaire

महत्त्वाच्या बातम्या

वाढदिवसादिवशी ऑनलाईन केक मागवला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या बँकेत मोठा घोटाळा

काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, कारचा चक्काचूर, एकाच कुटुंबातील…

पांड्याला ट्रोल केल्यास कारवाई होणार? मुंबई क्रिकेट असोसिएशननं सांगितलं सत्य

फक्त अशी घरं पाहून मारायचे डल्ला, मुंबईच्या चोरट्यांची पुण्यातल्या घरांवर वक्रदृष्टी