बाबरला पुन्हा कर्णधार बनवल्याने शाहिद आफ्रिदी संतापला, जावयाला डच्चू!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shahid Afridi | ट्वेंटी-20 विश्वचषकापूर्वी पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत संघात बदल केला आहे. शाहीन शाह आफ्रिदीला डच्चू देऊन पुन्हा एकदा बाबर आझमच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागील वर्षी भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. मग पीसीबीने शान मसूदकडे कसोटी तर शाहीन आफ्रिदीला ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार बनवले. (Babar Azam News)

बाबर आझमला पुन्हा कर्णधार बनवल्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी चांगलाच संतापला. खरं तर शाहीन आफ्रिदी हा शाहिद आफ्रिदीचा जावई आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या घोषणेनंतर शाहिद आफ्रिदी म्हणाला की, निवड समितीत अनेक अनुभवी खेळाडू देखील सामील होते. त्यामुळे हा निर्णय पाहून मला धक्का बसला. मला वाटते की, जर संघात कोणता बदल करायचा होता तर मोहम्मद रिझवान कर्णधारपदासाठी योग्य पर्याय होता. पण, आता निर्णय झाला असल्यामुळे मी पाकिस्तानी संघ आणि बाबर आझमला शुभेच्छा देतो.

शाहीन आफ्रिदीला डच्चू

शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वात पाकिस्तानने न्यूझीलंडविरूद्ध एकमेव मालिका खेळली. आगामी काळात न्यूझीलंडचा संघ ट्वेंटी-20 मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. बाबरने 15 नोव्हेंबर 2023 रोजी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. याला पाच महिने देखील पूर्ण झाले नाहीत. तोच बाबर पुन्हा एकदा कर्णधार झाला आहे.

अलीकडेच पाकिस्तानी खेळाडूंनी फिटनेस कॅम्पमध्ये हजेरी लावली. पाकिस्तानचे खेळाडू आर्मी स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी गेले. तेथे खेळाडूंनी फिटनेस कॅम्पमध्ये सहभाग नोंदवत प्रशिक्षणाचे धडे घेतले. भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात भूकंप पाहायला मिळाला.

 

Shahid Afridi ची नाराजी

पीसीबी अध्यक्षांसह कर्णधार आणि प्रशिक्षक बदलण्यात आला. जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक होणार आहे. बाबर आता पाकिस्तानच्या वन डे आणि ट्वेंटी-20 संघाची धुरा सांभाळेल. बाबर एकमेव असा कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने भारताला ट्वेंटी-20 विश्वचषकात पराभूत केले.

भारतात झालेल्या वन डे विश्वचषकात पाकिस्तानला अफगाणिस्तानकडून देखील पराभव स्वीकारावा लागला होता. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत ट्वेंटी-20 आणि वन डे संघाच्या कर्णधारपदी पुन्हा एकदा बाबर आझमच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत मोहम्मद रिझवानचे नाव देखील आघाडीवर होते. पण, बोर्डाने बाबरवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

News Title- Mohammad Rizwan should have been made Pakistan captain instead of Babar Azam, says Shahid Afridi
महत्त्वाच्या बातम्या –

‘आम्ही मित्रच…’; अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन

यंदाची निवडणूक जिंकणार का?, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

वाढदिवसादिवशी ऑनलाईन केक मागवला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या बँकेत मोठा घोटाळा

काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, कारचा चक्काचूर, एकाच कुटुंबातील…