CSK ची हार पण धोनीचा भारी ‘पंच’, चाहत्यांचा एकच जल्लोष; ठरला ऐतिहासिक सामना

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CSK vs DC | आयपीएलच्या सतराव्या हंगामात विजयाच्या खाते उघडण्यात अखेर दिल्ली कॅपिटल्सला यश आले. रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीने चेन्नई सुपर किंग्जचा 20 धावांनी पराभव केला. (CSK vs DC Match) गतविजेत्या चेन्नईला यंदाच्या हंगामातील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) स्फोटक खेळीमुळे सामन्यात रंगत आली. चेन्नईने सामना गमावला असला तरी धोनीची खेळी पाहून चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मागील तीन सामन्यांपासून चाहते धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी आतुर होते, जी प्रतीक्षा अखेर संपली. (IPL 2024 News)

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यातून धोनीने यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक 300 फलंदाजांना बाहेर पाठवण्याची किमया साधली. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा माही जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. यासह दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आयपीएल कारकिर्दीतील त्याचे 62 वे अर्धशतक झळकावले.

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा अर्धशतकी खेळी करणाऱ्यांच्या यादीत वॉर्नर (62) अव्वल स्थानी आहे. या यादीत विराट कोहली (52) अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ट्वेंटी-20 कारकिर्दीत 110 हून अधिकवेळा 50 हून अधिक धावा करण्याच्या बाबतीत वॉर्नरने ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. या यादीत विराट कोहली (101) अर्धशतकांसह तिसऱ्या स्थानी आहे.

MS Dhoni टॉपवर (सर्वाधिक बळी घेणारे यष्टीरक्षक)

महेंद्रसिंग धोनी (भारत) – 300
दिनेश कार्तिक (भारत) – 247
कामरान अकमल (पाकिस्तान) – 247
क्विंटन डॉकॉक (दक्षिण आफ्रिका) – 270
जोस बटलर (इंग्लंड) – 209

CSK vs DC दिल्लीचा पहिला विजय

अखेरच्या षटकात चेन्नईच्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक होती. पण, धोनीने नेहमीप्रमाणे स्फोटक खेळी करत चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याने एनरिक नॉर्तजेच्या या षटकात 20 धावा कुटल्या. माहीने त्याच्या खेळीत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 16 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या.

 

ट्वेंटी-20 मध्ये सर्वाधिकवेळा 50+ धावा

डेव्हिड वॉर्नर – (ऑस्ट्रेलिया) – 110 वेळा
ख्रिस गेल – (वेस्ट इंडिज) – 110 वेळा
विराट कोहली – (भारत) – 101 वेळा
बाबर आझम – (पाकिस्तान) – 98 वेळा
जोस बटलर – (इंग्लंड) – 86 वेळा

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 191 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 20 षटकांत 6 बाद केवळ 171 धावा करू शकला. पॉवरप्लेमध्ये चेन्नईच्या फलंदाजांनी धिम्या गतीने धावा केल्याने संघाने 20 धावांनी सामना गमावला. पण, धोनीच्या अप्रतिम खेळीसाठी ‘स्ट्रायकर ऑफ द मॅच’ अवॉर्डने गौरवण्यात आले.

News Title- csk vs dc ipl 2024 match in become historic, ms dhoni and david warner performed well
महत्त्वाच्या बातम्या –

धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-20 मध्ये असं करणारा बनला जगातील पहिला खेळाडू

WHAT A CATCH! अद्भुत अविश्वसनीय; CSK च्या शिलेदाराचा अप्रतिम झेल, Video

“हिंमत असेल तर पक्षाच्या बॅनरवर ईडी, सीबीआयचे फोटो लावा”, उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले

बाबरला पुन्हा कर्णधार बनवल्याने शाहिद आफ्रिदी संतापला, जावयाला डच्चू!

‘आम्ही मित्रच…’; अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन