वानखेडेवर MI vs RR; मुंबई विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MI vs RR | मुंबई इंडियन्स (MI) आज (1 एप्रिल) यावर्षीच्या आयपीएल हंगामातील घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणार आहे. मुंबईसमोर आज राजस्थान रॉयल्सचे (RR) आव्हान असणार आहे. यंदाच्या हंगामातील आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला घरच्या मैदानाचा फायदा होणार आहे.

मुंबईचा नवोदित कर्णधार हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या काही चुकीच्या निर्णयामुळे मुंबईला लगातार पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबईला सलामीच्या लढतीत हार्दिकचा माजी संघ गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला.

तर, दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने विक्रमी धावसंख्या उभारत मुंबईला पराभूत केलं. यामुळे मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत तळाला गेला आहे. आजच्या सामन्यात पहिल्या विजयासाठी मुंबई घरच्या मैदानात खेळण्यास उतरेल.

MI vs RR सामना रंगणार

मुंबईकडून माजी कर्णधार रोहितने पहिल्या दोन्ही सामन्यांत संघाला चांगली सुरुवात केली. मात्र, त्याच्याकडून मोठया खेळीची मुंबईला आस असणार आहे. यासोबतच इशान किशनकडेही सर्वांच्या नजरा असतील. गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास 17 वर्षीय तरुण गोलंदाज क्वेना मफाकाने गेल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध पदार्पणात चार षटकांत 66 धावा दिल्या होत्या. मुंबईला फिल्डिंगमध्येही अधिक लक्ष्य द्यावं लागणार आहे.

दुसरीकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाने यंदाच्या हंगामाची (MI vs RR) सुरुवात सलग दोन विजयांसह केली आहे. सलामीवीर मुंबईकर यशस्वी जैस्वालला पहिल्या दोन सामन्यांत फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र, आता त्याला घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे.

अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

मुंबई इंडियन्स (MI)संभाव्य प्लेयिंग 11 : रोहित शर्मा, इशान किशन (wk), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (c), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका.

राजस्थान रॉयल्स (RR) संभाव्य प्लेयिंग 11 : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (c & wk), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.

News Title : MI vs RR match IPL 2024

महत्त्वाच्या बातम्या-

CSK ची हार पण धोनीचा भारी ‘पंच’, चाहत्यांचा एकच जल्लोष; ठरला ऐतिहासिक सामना

धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-20 मध्ये असं करणारा बनला जगातील पहिला खेळाडू

WHAT A CATCH! अद्भुत अविश्वसनीय; CSK च्या शिलेदाराचा अप्रतिम झेल, Video

“हिंमत असेल तर पक्षाच्या बॅनरवर ईडी, सीबीआयचे फोटो लावा”, उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले

बाबरला पुन्हा कर्णधार बनवल्याने शाहिद आफ्रिदी संतापला, जावयाला डच्चू!