प्रेक्षकांना आता घरबसल्या ‘शैतान’ चित्रपट पाहता येणार; यादिवशी ओटीटीवर रिलीज होणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shaitaan OTT Release Date l ॲक्शनपासून कॉमेडीपर्यंत सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा दाखवणाऱ्या अजय देवगणच्या ‘शैतान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अजय देवगण आणि आर माधवन यांचा शैतान हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या गुजराती चित्रपट ‘वश’चा हिंदी रिमेक आहे.

Shaitaan OTT Release Date l ‘शैतान’ हा चित्रपट या दिवशी ओटीटीवर रिलीज होणार :

चित्रपटाच्या यशानंतर या क्राईम थ्रिलर कथेचा पार्ट 2 लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण अजय देवगणच्या ज्या चाहत्यांनी हा चित्रपट यापूर्वी पाहिला नसेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच अजयचा ‘शैतान’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

अजय देवगणचा ‘शैतान’ हा चित्रपट 3 मे 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वीच OTT प्लॅटफॉर्म Netflix ने ‘शैतान’ चे OTT अधिकार खरेदी केले होते. त्यामुळे तुम्हाला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमचे सब्स्क्रिप्शन असणे गरजेचे आहे. तसेच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर 45 दिवसांनी त्याचा प्रीमियर टीव्हीवर होऊ शकतो आणि तुम्ही हा चित्रपट ‘जिओ सिनेमा’वर देखील पाहू शकता.

हा चित्रपट जिओवर देखील पाहता येणार :

खरंतर जिओ स्टुडिओने देवगन फिल्म्स आणि पॅनोरमा स्टुडिओच्या सहकार्याने ‘शैतान’ ची निर्मिती केली आहे. हेच कारण आहे की नेटफ्लिक्स आणि टीव्हीवर स्ट्रीम केल्यानंतर काही महिन्यांनंतर हा चित्रपट Jio ॲपवर मोफत पाहण्यास उपलब्ध होणार आहे. मात्र या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना ‘शैतान’ पाहण्यासाठी 3 मे ची वाट पाहावी लागणार आहे.

तसेच या चित्रपटात ‘शैतान’ची कथा कबीर (अजय देवगण), वनराज (आर माधवन), जान्हवी (जानकी बोडीवाला) आणि ज्योती (ज्योतिका) यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. मात्र शैतान या चित्रपटासंदर्भात नेटफ्लिक्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

News Title- Shaitaan OTT Release Date

महत्त्वाच्या बातम्या –

भन्नाट फीचर्ससह Realme कंपनीचा स्मार्टफोन लाँच; Samsung ला मागे टाकणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; LPG सिलेंडर ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त

‘या’ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल, वाचा राशीभविष्य

CSK ची हार पण धोनीचा भारी ‘पंच’, चाहत्यांचा एकच जल्लोष; ठरला ऐतिहासिक सामना

धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-20 मध्ये असं करणारा बनला जगातील पहिला खेळाडू