लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; LPG सिलेंडर ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

LPG Price | लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आज (1 एप्रिल) नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. एलपीजी सिलेंडरमध्ये 32 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

या घोषणेनुसार आजपासून दिल्लीत एलपीजी सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले आहेत. तर कोलकात्यात 32 रुपयांनी, मुंबईत 31.50 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 30.50 रुपयांनी एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला आहे.

सरकारने फक्त व्यावसायिक सिलेंडरमध्ये एलपीजीचे दर कमी केले आहेत. घरगुती सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.

LPG सिलेंडर 32 रुपयांनी स्वस्त

सरकारने मार्चमध्ये महिला दिनानिमित्त घरगुती सिलेंडरच्या ग्राहकांना मोठी भेट दिली होती. 8 मार्चला सहा महिन्यांत दुसऱ्यांदा एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. यापूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशीही एलपीजीत 200 रुपयांनी कपात केली होती.

IOC नुसार, आजपासून दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलेंडर 1764.50 रुपयांना मिळेल. पूर्वी तो 1795 रुपयांना मिळत होता. कोलकाता येथे हा सिलेंडर (LPG Price) आता 1911 रुपयांऐवजी 1879 रुपयांना मिळेल. तर, चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता 1930 रुपयांना मिळणार आहे.

मुंबईत ‘असे’ असतील दर

मुंबईत (LPG Price) 1717.50 रुपयांना व्यावसायिक सिलेंडर मिळणार आहे. पूर्वी तो 1849 रुपयांना मिळत होता.  मुंबईत 31.50  रुपयांनी सिलेंडर स्वस्त झाले. यासोबतच पाटणा, बिहारमध्येही याचे दर कमी झाले आहेत. पाटणामध्ये आजपासून व्यावसायिक सिलेंडर 2039 रुपयांना मिळेल तर घरगुती सिलिंडर 901 रुपयांना मिळणार आहे.

News Title- LPG Price cheaper by Rs 30 Relief before elections

महत्त्वाच्या बातम्या –

CSK ची हार पण धोनीचा भारी ‘पंच’, चाहत्यांचा एकच जल्लोष; ठरला ऐतिहासिक सामना

धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-20 मध्ये असं करणारा बनला जगातील पहिला खेळाडू

WHAT A CATCH! अद्भुत अविश्वसनीय; CSK च्या शिलेदाराचा अप्रतिम झेल, Video

“हिंमत असेल तर पक्षाच्या बॅनरवर ईडी, सीबीआयचे फोटो लावा”, उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले

बाबरला पुन्हा कर्णधार बनवल्याने शाहिद आफ्रिदी संतापला, जावयाला डच्चू!