Suzuki V-Storm 800DE बाईक बाजारात धुमाकूळ घालणार; होंडा कंपनीशी होणार तगडी स्पर्धा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Suzuki Launched V Strom 800DE l सुझुकी कंपनीने नवीन बाईक भारतात लाँच केली आहे. Suzuki V-Storm 800DE ही बाईक भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. या बाइकमध्ये 776 CC इंजिन देण्यात आले आहे. Suzuki कंपनीने ही बाइक स्टील फ्रेमसह डिझाइन केली आहे. तसेच या बाईकची इंधन टाकीची क्षमता 20-लिटर असणार आहे. ही बाईक होंडा आणि ट्रायम्फच्या वाहनांशी स्पर्धा करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सुझुकी V-Storm 800DE पॉवरट्रेन :

Suzuki V-Storm 800DE ही एक उत्तम आणि शक्तिशाली बाईक आहे. या बाइकमध्ये नवीन लिक्विड-कूल्ड, 776 सीसी, 270-क्रँक पॅरलल ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे सुझुकी इंजिन 83.4 bhp पॉवर जनरेट करते आणि 78 Nm टॉर्क देखील प्रदान करते. या नवीन मॉडेलमध्ये 6-स्पीड गिअर बॉक्स आहे. बायडायरेक्शनल क्विक शिफ्टर बाइकवर मानक स्वरूपात आहे.

Suzuki Launched V Strom 800DE l सुझुकीच्या नवीन मॉडेलची वैशिष्ट्ये काय आहेत? :

V-Storm 800DE सुझुकीचे मॉडेल बाईकच्या इतर मॉडेल्सप्रमाणे स्टील फ्रेमने बनवलेले आहे. तसेच या मोटरसायकलचे वजन तब्बल 230 किलो असणार आहे. याशिवाय बाईकची सीट देखील इतर बाईकच्या तुलनेत थोडी लांब ठेवण्यात आली आहे.

Suzuki V-Storm 800DE ही कार प्रतिस्पर्धी Honda Transalp 750 आणि Triumph Tiger Sport 850 कार सोबत करणार आहेत. तसेच Honda Translap 750 ची किंमत 11 लाख रुपये आहे. तर सुझुकीने आपल्या नवीन मॉडेलची किंमत 10.30 लाख रुपये ठेवली आहे.

सुझुकीच्या सर्व बिग-बाईक डीलरशिपवर या बाईकची बुकिंग देखील सुरू झाली आहे. कंपनीने ही बाईक बाजारात तीन रंगांमध्ये उपलब्ध केली आहे. यामध्ये चॅम्पियन यलो, ग्लास मॅट मेकॅनिकल ग्रे आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक कलर असणार आहेत.

News Title- Suzuki Launched V Strom 800DE

महत्त्वाच्या बातम्या –

प्रेक्षकांना आता घरबसल्या ‘शैतान’ चित्रपट पाहता येणार; यादिवशी ओटीटीवर रिलीज होणार

‘या’ नियमात बदल!; सर्वसामान्यांच्या खिशावर होतील परिणाम; वाचा सविस्तर

वानखेडेवर MI vs RR; मुंबई विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक

भन्नाट फीचर्ससह Realme कंपनीचा स्मार्टफोन लाँच; Samsung ला मागे टाकणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; LPG सिलेंडर ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त