पुण्यात चाललंय काय?; सोशल मीडियावर धंगेकरांचा ‘तो’ फोटो व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ravindra Dhangekar | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. पुण्याच्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. काही दिवसांपासून पुण्याच्या राजकारणामध्ये अनेक ट्वीस्ट निर्माण झाले आहेत. अशातच आता काही दिवसांआधी रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना काँग्रेसमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. मात्र आता पुण्यात धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या शिक्षणावरून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करण्यात येत आहे. (Ravindra Dhangekar)

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. लोक त्याचा कोणत्या अर्थाने वापर करतात हे त्यांच्यावर निर्भर असतं. पुण्यामध्ये सोशल मीडियावर ‘मविआचा अशिक्षित उमेदवार’, म्हणून धंगेकरांना ट्रोल केलं जात आहे. ‘रवींद्र धंगेकर फक्त 8 वी पास’, शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरामध्ये पुण्याचा उमेदवार अशिक्षित अशा आशयाने लिहिलेला धंगेकरांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. (Ravindra Dhangekar)

धंगेकरांचा पलटवार

धंगेकरांच्या शिक्षणावर भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल केलं आहे. याला आता धंगेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. धंगेकर म्हणाले की, “ते माझ्या शिक्षणावर घसरलेत, याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसतोय. माझी जनतेत जाण्याची पीएचडी झाली आहे. जनतेनं मला पीएचडीचं प्रमाणपत्रही दिलं आहे”, असं धंगेकर म्हणाले.

भाजप आणि मोदींवर निशाणा

धंगेकर यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपने अबकी बार 400 पारचा नारा लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. यावरूनच धंगेकर यांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला आहे. जर देशात मोदींची हवा असती तर अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना पक्षात घ्यावं लागलं नसतं. आज ते मात्र टू व्हिलरवर फिरत आहेत मात्र उद्या मी त्यांना रस्त्यावर आणणार, असंही ते म्हणाले.

मी जिकडे जाईल तिकडे त्यांना प्रचार करावा लागणार आहे. भाजपने काही दिवसांआधी आचारसंहिता लागल्यानंतर भिंतीवर कमळ चिन्हाचा वापर करत प्रचार करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व जाणून बूजून केल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. आचारसंहितेचा भंग जाणूनबुजून केला जात असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला.

भारतीय जनता पक्ष हा जाणूनबुजून शहरभर कमळ या चिन्हाचे वॉल पेंटिंग करत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. यावर जर कारवाई झाली नाहीतर आम्हीही काँग्रेसचं चिन्ह लावणार, असा इशारा धंगेकर यांनी दिला आहे.

News Title – Ravindra Dhangekar Troll On Social Media

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ नियमात बदल!; सर्वसामान्यांच्या खिशावर होतील परिणाम; वाचा सविस्तर

वानखेडेवर MI vs RR; मुंबई विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक

भन्नाट फीचर्ससह Realme कंपनीचा स्मार्टफोन लाँच; Samsung ला मागे टाकणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; LPG सिलेंडर ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त

‘या’ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल, वाचा राशीभविष्य