वर्कआउट दरम्यान ‘या’ चुका पडू शकतात महागात; अशी घ्या काळजी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Workout Skincare | फिट बॉडीसाठी तरुणाई वर्कआउट वर अधिक लक्ष केंद्रित करत असते. सर्वांनाच आकर्षक रूप हवं असतं. सध्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल होत आहेत. अगदी खाण्यापासून ते वागण्यापर्यंत हे बदल दिसून येतात. आता जिथे तिथे जीम दिसून येतात.

फास्ट फूड खाण्याबरोबरच तरुणाई वर्कआउट करण्यालाही तेवढंच प्राधान्य देतात. पण, हे करत असताना काही चुका आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतात. यामुळे तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. आता या चुका कोणत्या आहेत, याबाबत तुम्हाला या लेखात संपूर्ण माहिती दिली आहे.

जिममध्ये वर्कआऊट करण्यासाठी लोक खूप मेहनत करतात. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून व्यायामासाठी वेळ काढता, पण इतके कष्ट करूनही तुमची त्वचा खराब तर होत नाहीये ना?, जर तुमचे उत्तर हो असेल तर याला वर्कआउट दरम्यान काही चुका कारणीभूत असू शकतात, ज्या त्वचेसाठी हानिकारक आहेत.

वर्कआऊट करताना केलेल्या चुकांमुळे (Workout Skincare) त्वचेच्या समस्या तर होतातच पण केसांच्या समस्याही होतात. हे टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हीही रोज जिमला जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

सतत त्वचेला स्पर्श करू नका-

बऱ्याचदा असं होतं की, जिममध्ये वर्कआऊट (Workout Skincare) करताना लोक घाम पुसण्यासाठी हाथ वापरतात, परंतु यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. व्यायाम करताना वारंवार चेहऱ्याला स्पर्श केल्याने तुमच्या चेहऱ्यावर हाथाची घाण लागू शकते. यामुळे मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात. जीममध्ये बरेच लोक एकाच मशीनचा वापर करतात. यामुळे तुमच्या हाताला जंतु लागतात, तेच जंतु मग चेहऱ्याला लागले जातात. म्हणून वारंवार चेहऱ्याला स्पर्श करू नये.

मेकअप लावून व्यायाम करू नका-

मेकअप करून जिममध्ये जाणारे बरेच लोक आहेत. आजकाल, सोशल मीडियावर रील तयार करण्यासाठी बरेच लोक मेकअप करतात आणि व्यायाम करतात, जे त्वचेसाठी हानिकारक आहे. जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा शरीरातून घाम येतो. हा घाम त्वचेच्या छिद्रांद्वारे बाहेर पडतो. पण मेकअपमुळे छिद्रे ब्लॉक होतात आणि पुरळ येऊ शकतात. त्यामुळे मेकअप लावून व्यायाम करू नये.

परफ्यूमचा वापर-

जीमला जाताना बरेच व्यक्ती परफ्यूमचा वापर करतात. घाम किंवा दुर्गंधी टाळण्यासाठी लोक रोल-ऑन अंडरआर्म्स देखील वापरतात, जे त्वचेसाठी हानिकारक असू शकतात. यामुळे वर्कआउट करताना त्वचेची छिद्रे बंद होण्याची (Workout Skincare) शक्यता असते. त्यामुळे घाम बाहेर पडत नाही. घाम नीट सुटत नसल्यामुळे त्वचेवर जळजळ, लालसरपणा किंवा पिंपल्सची समस्या निर्माण होऊ शकते.

केस घट्ट बांधा-

अनेकदा मुली व्यायामासाठी जिममध्ये गेल्यावर उंच पोनीटेल घालतात, परंतु केस घट्ट बांधल्यामुळे केस कमकुवत होतात आणि तुटतात. त्यामुळे व्यायाम करताना घट्ट वेणी बांधू नका. या कारणामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. वाटलं तर तुम्ही केसांची साधी वेणीही घालू शकता.

News Title- Workout Skincare

महत्त्वाच्या बातम्या –

प्रेक्षकांना आता घरबसल्या ‘शैतान’ चित्रपट पाहता येणार; यादिवशी ओटीटीवर रिलीज होणार

‘या’ नियमात बदल!; सर्वसामान्यांच्या खिशावर होतील परिणाम; वाचा सविस्तर

वानखेडेवर MI vs RR; मुंबई विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक

भन्नाट फीचर्ससह Realme कंपनीचा स्मार्टफोन लाँच; Samsung ला मागे टाकणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; LPG सिलेंडर ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त