कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार; SSC मध्ये तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

SSC JE Bharti 2024 l कित्येक तरुणांना स्वप्न साकार करण्याची एक संधी आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) कनिष्ठ अभियंता (JE) च्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेद्वारे एकूण 966 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार ssc.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

SSC JE Bharti 2024 l वयोमर्यादा काय असणार? :

या भरती अंतर्गत इच्छुक उमेदवार 18 एप्रिल पर्यंत अर्ज करू शकतात. सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्जासाठी 100 रुपये भरावे लागणार आहेत, तर इतर प्रवर्गातील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांचे कमाल वय 30 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच 1 ऑगस्ट 2024 हा आधार मानून वयाची गणना केली जाणार आहे. महत्वाचं म्हणजे ही भरती कनिष्ठ अभियंता भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रिलिम्स, मुख्य आधारावर केली जाणार आहे.

SSC JE Bharti 2024 l पदाचे नाव आणि पदसंख्या :

– ज्युनियर इंजिनिअर (Civil) – 788
– ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) – 15
– ज्युनियर इंजिनिअर (Electrical)- 128
– ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) – 37

शैक्षणिक पात्रता काय असणार? :

स्टाफ सिलेक्शन कमिशनने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पात्र उमेदवार सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक पात्रतेसंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण कुठे असणार? :

या भरती अंतर्गत नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार https://ssc.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

News Title- SSC JE Bharti 2024

महत्त्वाच्या बातम्या –

अरे भाऊ म्युच्युअल फंड म्हणजे काय रे? अन् त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी

पुण्यात चाललंय काय?; सोशल मीडियावर धंगेकरांचा ‘तो’ फोटो व्हायरल

Suzuki V-Storm 800DE बाईक बाजारात धुमाकूळ घालणार; होंडा कंपनीशी होणार तगडी स्पर्धा

प्रेक्षकांना आता घरबसल्या ‘शैतान’ चित्रपट पाहता येणार; यादिवशी ओटीटीवर रिलीज होणार

‘या’ नियमात बदल!; सर्वसामान्यांच्या खिशावर होतील परिणाम; वाचा सविस्तर