‘पलटूराम शेवटी आपला आवाका दाखवला’; शिवतारेंना कार्यकर्त्यांनी सुनावलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay Shivtare Letter | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांआधी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जागेची अधिक चर्चा होती. त्याला शिवसेना माजी आमदार विजय शिवतारे कारणीभूत होते. त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या आणि संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढण्याचा निर्धार केला होता. मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे. (Vijay Shivtare Letter)

काही दिवसांआधी विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी हट्ट धरला होता. ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरही गेले होते. बारामती कोणाचा सातबारा आहे का? कोणाची जहागीर आहे का?, अशी टीका त्यांनी केली होती. मात्र शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजोता केला. त्यावेळी शिवतारे यांनी माघार घेतली आहे. त्यावर आता शिवतारे यांच्या पुरंदर एका कार्यकर्त्याने शिवतारे यांना पत्र (Vijay Shivtare Letter) लिहित सुनावलं आहे.

काय आहे पत्रात?

News18

बारामतीतून लढण्यासाठी विजय शिवतारे यांनी निर्धार केला होता. त्यावेळी शिवतारे यांनी केलेल्या वक्तव्यांचा पत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यावर कार्यकर्त्याने खरपूस समाचार घेतला आहे. पत्राच्या सुरूवातीलाच ‘पुरंदरचा तह ‘ अशा आशयाने पत्राची सुरूवात करण्यात आली. विजय शिवतारे यांनी केलेले वक्तव्य पत्रामध्ये ठळक स्वरूपात अधोरेखित करण्यात आले आहे. तर आता त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय.

पत्रातून शिवतारेंना डिवचलं

पत्रामध्ये शिवतारे यांनी माघार घेतल्याने एका कार्यकर्त्याने त्यांना डिवचलं आहे. फाडा पोस्टर निकला हिरो, महाराष्ट्राचा पलटूराम, शिव’तारे’ जमीनपर, शेवटी आपला आवाका दाखवला, पाकीट भेटलं का?, 50 खोके शिवतारे ओके, चिऊतारे अशा अनेक मिश्किल उपमा शिवतारे यांना उद्देशून त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आल्या असून शिवतारे यांना डिवचलं आहे. (Vijay Shivtare Letter)

शिवतारेंनी माघार घेतल्याचं कारण सांगितलं

शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये शिवतारे यांनी माघार घेण्यामागचं खरं कारण सांगितलं. शिवतारे म्हणाले की, “दोन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यानंतर दोनदा फोनवर बोलणं झालं. मात्र मी माझा निर्णय बदलला नव्हता. मात्र मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा फोन आला. तेव्हा सांगितलं की तुमच्यामुळे अडचण होईल. त्याआधी मुख्यमंत्री ही माझ्यावर रागवले होते”, असं शिवतारे म्हणाले. (Vijay Shivtare Letter)

“सर्वच ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे राहिले तर 10 ते 12 खासदार पडतील. मुख्यमंत्र्यांना अडचणीला समोरं जावं लागेल”, असं शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना सांगितलं आहे.

News title – Vijay Shivtare Letter News update

महत्त्वाच्या बातम्या

‘आम्ही मित्रच…’; अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन

यंदाची निवडणूक जिंकणार का?, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

वाढदिवसादिवशी ऑनलाईन केक मागवला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या बँकेत मोठा घोटाळा

काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, कारचा चक्काचूर, एकाच कुटुंबातील…