“पतीची हत्या करेल त्याला…”; बायकोच्या कृत्याने सगळेच हादरले!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Whats app Status | सोशल मीडियाचा दिवसेंदिवस अति प्रमाणात वापर होत असताना दिसत आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाच्या चांगलेच आहारी गेले आहेत. आपल्या खासगी आयुष्यात होत असलेल्या छोट्या मोठ्या घडामोडी सोशल मीडियावर सांगणं हा एकप्रकारे ट्रेंडच झाला आहे. मात्र, याच सोशल मीडियावर कधी काय होईल सांगता येत नाही. एका पत्नीने चक्का आपल्या पतीला मारण्यासाठी व्हॉट्सॲपद्वारे सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सॲपवर पतीला मारण्यासाठी सुपारी देत स्टेट्स ठेवल्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली.

काय आहे प्रकरण?

पतीला मारुन टाकण्याची सुपारी पत्नीने व्हाॅट्सअॅपवरुन (Whats app Status) दिल्याने सगळीकडे खळबळ उडाली. हा प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये घडल्याचं समोर आलं आहे. पती आणि पत्नी यांच्यामध्ये सतत कोणत्या न केणत्या कारणावरुन मतभेद व्हायचे. शिवाय दोघांमध्ये भांडण व्हायचं.

त्यामुळे, या वादाला कंटाळून माहेरी राहणाऱ्या पत्नीने थेट पतीच्या हत्येची सुपारीदेखील दिली. एवढंच नव्हे तर व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवून पतीची हत्या करणाऱ्या व्यक्तीला 50 हजार रुपयांचं बक्षीस देखील जाहीर केलं. मात्र पतीने, पत्नीचं हे स्टेटस पाहिलं आणि त्याला घामच फुटला. भेदरलेल्या पतीने थेट पोलिसांत धाव घेत मदतीची याचना केली.

जबरदस्ती लग्न-

21 डिसेंबर 2023 रोजी या दोघांची कोर्टात तारीख होती. या वेळी पतीला सासरच्यांनी त्यांच्याच जावयाला जीवे मारण्याची धमकी दिली. तेवढ्यातच त्या विवाहीत महिलेने आता कालच तिच्या व्हॉट्सॲप (Whats app Status) स्टेटसवर पतीला मारण्यासाठी सुपारी दिली. ‘माझ्या इच्छेविरुद्ध लग्न झाले आहे. जो कोणी माझ्या पतीची हत्या करेल त्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल’, असे पत्नीने तिच्या स्टेटसवर लिहीले होते.

आग्रा येथील प्रकार-

पीडित पतीने त्याच्या पत्नीच्या मित्रावर धमकी दिल्याचा आरोपही केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे धक्कादायक प्रकरण आग्रा येथील बह पोलीस स्टेशन परिसरातील आहे. याप्रकरणी फिर्यादीने पोलिसांत धाव घेत तक्रार केली.

News Title : whats app status by wife for killing husband

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ गोष्टीमुळे हवामान विभागाला वातावरणाचा अंदाज समजतो!

मोठी बातमी! चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

“वेळ आली की मी…”, निलेश लंके यांचं मोठं वक्तव्य

“कितीबी समोर येऊदे त्यांना…”, सुप्रिया सुळेंचं व्हॅट्सअॅप स्टेटस चर्चेत

“मी ईडीबिडीला घाबरत नाही…”, प्रणिती शिंदे पुन्हा कडाडल्या