“कितीबी समोर येऊदे त्यांना…”, सुप्रिया सुळेंचं व्हॅट्सअॅप स्टेटस चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघामध्ये यंदा पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार आहे. बारामती मतदारसंघ (Baramati Lok Sabha) हा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड केलं. अजित पवार आणि शरद पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना दिलं. त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार आणि निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला होता. यामुळे यंदा राज्याचं राजकारण हे वेगळ्या वळणावर गेलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक ट्वीस्ट घडत आहेत. सध्या सुप्रिया सुळेंच्या स्टेटसने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सुप्रिया सुळेंनी शरद पवार यांचा फोटो आपल्या व्हॅट्सअॅप स्टेटसला ठेवला आहे. त्यावेळी कितीबी समोर येऊदे त्यांना एकटा बास, असं त्या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे. सध्या त्याची राज्यभरामध्ये चर्चा होताना दिसतेय.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॅट्सअॅपला दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या फोटोमध्ये शरद पवार यांनी आपले दोन्ही हात वरती केले आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये शरद पवार यांनी कॉलर वर उडवताना दिसत आहेत. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आश्वासक चेहरा कोण?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती तेव्हा माध्यमांनी शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण?, असा प्रश्न केला. तेव्हा शरद पवार यांनी हात वर करत शरद पवार असं स्वत:चं नाव घेत उत्तर दिलं. तेव्हाचा फोटो सुप्रिया सुळे यांनी स्टेट्सला ठेवला आहे.

कॉलर उडवताना फोटो

दुसऱ्या फोटोत शरद पवार साताऱ्यामध्ये गेले असता पत्रकार परिषद घेतली गेली. त्यावेळी त्यांनी उदयनराजे यांच्याविरोधात संभाव्य उमेदवार कोण असेल? असं सांगितलं तेव्हा त्यांनी स्वत: कॉलर उडवत उत्तर दिलं आहे.

हाच फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. ‘कितीबी येऊदे त्यांना एकटा बास’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आपल्या विरोधाकांना डिवचलं आहे.

whatsapp image 2024 04 01 at 2.44.04 pm 2024041204036

News Title – Baramati Lok Sabha Supriya Sule Warns Oponnents By Posting Sharad Pawar Video

महत्त्वाच्या बातम्या

उन्हाच्या झळा वाढल्या, उष्माघातापासून ‘असा’ करा स्वतःचा बचाव

“जर तुम्हाला वहिनी आईसमान वाटते तर निवडणूक नका लढवू”

एकनाथ शिंदेंना धक्का?, ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात जाणार?

कमी बजेटमध्ये साजरी करा उन्हाळ्याची सुट्टी; या ठिकाणांना अवश्य भेट द्या

“मला निवडून दिलं तर मी प्रत्येक गावात बिअर बार सुरू करेन”