“मी ईडीबिडीला घाबरत नाही…”, प्रणिती शिंदे पुन्हा कडाडल्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Praniti Shinde | काही दिवसांपासून सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) विरोधकांवर पेटून उठल्या आहेत. त्या विरोधकांवर टीका करण्यासाठी कसलीही कसर सोडत नाही. सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांना पुन्हा एकदा भाजपला धारेवर धरलं आहे. त्यावेळी मी ईडीबिडीला घाबरत नसल्याचं वक्तव्य प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केलं आहे.

सध्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या काँग्रेसकडून सोलापूर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. तर त्यांच्याविरोधात माळशिरसचे आमदार भाजप नेते राम सातपूते लढणार आहेत. राम सातपूते आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच आता प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला.

सर्वधर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्माच्या नावावर मतदान द्यायला प्रवृत्त केलं जात आहे. जोपर्यंत असंच होत राहिल तोवर लोकशाहीला खतरा निर्माण होईल. ते फक्त तुम्हाला गाजर दाखवत आहेत. जोवर काँग्रेस जिवंत आहे तोवर तुमचा आवाज दाबू देणार नाही. मी राजकारणामध्ये टक्केवारी आणि सत्तेसाठी कधीच आली नव्हती. त्यामुळे माझा तुम्हाला त्रास होणार नाही, असं त्या म्हणाल्यात.

भाजपनं दिला ठेंगा

भाजपला मागील दहा वर्षामध्ये मतदारांनी सर्वकाही दिलं. मात्र भाजपनं मतदारांना ठेंगा दिला. भाजपने तुमचा विश्वासघात केलाय. भाजपने तुम्हाला धोका दिला आहे. 10 वर्षात सोलापूरने निवडून दिलेल्या भाजपच्या खासदाराने काय काम केलं. हा एकच प्रश्न त्यांना विचारा. त्यांची बोलती बंद होईल. निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोलचा भाव केवळ दोन रूपयांनी कमी केला आहे. ही लोकं आपणाला भिक देतायत की काय?, असा सवाल उपस्थित केला.

“भाजपने देशाला जातीची कीड लावली”

भाजपने आपल्या देशाला आणि धर्माला जातीची कीड लावलीय. तुमचा आवाज दिल्लीला घेऊन जाण्यासाठी ही लढाई आहे. मागील 10 वर्षात सोलापूर मतदारसंघावर भाजपने अन्याय केला आहे. भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली आहे, असंही त्या म्हणाल्या.

दिल्लीचे केजरीवाल यांना रातोरात अटक करतात. भाजपकडे आमदारांना विकत घ्यायला 50 कोटी आहेत. 400 पारचा आत्मविश्वास तुमच्यात आहे तर एवढी भिती का आहे? 400 सोडा मुश्किलने 100 च्या पण पार जाणार नाहीयेत. कारण त्यांच्याकडे तसा रिपोर्ट आहे, असंही प्रणिती म्हणाल्या.

News Title – Praniti Shinde Aggressive Against BJP At Solapur Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

अरे भाऊ म्युच्युअल फंड म्हणजे काय रे? अन् त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी

पुण्यात चाललंय काय?; सोशल मीडियावर धंगेकरांचा ‘तो’ फोटो व्हायरल

Suzuki V-Storm 800DE बाईक बाजारात धुमाकूळ घालणार; होंडा कंपनीशी होणार तगडी स्पर्धा

प्रेक्षकांना आता घरबसल्या ‘शैतान’ चित्रपट पाहता येणार; यादिवशी ओटीटीवर रिलीज होणार

‘या’ नियमात बदल!; सर्वसामान्यांच्या खिशावर होतील परिणाम; वाचा सविस्तर