IRCTC चं सर्वात भारी टूर पॅकेज; ‘5’ देश फिरा स्वस्तात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Europe Tour | भारतीय दरवर्षी परदेशामध्ये सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जात असतात. त्यापैकी युरोपात अनेकजण सुट्टीसाठी जातात. हे भारतीयांच्या आवडत्या जागांपैकी एक ठिकाण आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉरपोरेशन (IRCTC) तुमच्यासाठी एक भारी टूर पॅकेज घेऊन आलं आहे. याचा नक्कीच आनंद घेऊ शकता. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे दिलेल्या माहितीनुसार या टूर पॅकेजमध्ये जर्मनी, स्वित्झर्लंड, युरोपातील (Europe Tour) पाच देशांमध्ये सैर करता येणार आहे. (Europe Tour)

आयआरसीटीसीचं हे 13 दिवस आणि 12 रात्रीचं पॅकेज आहे. या पॅकेजची सुरूवात ही लखनऊपासून होणार आहे. 29 मे, 2024 पासून हा प्रवास सुरू होईल. त्यासाठी सध्या बुकींंगही सुरू होतील. या पॅकेजमध्ये फ्रान्स, नेदरलँड, स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि जर्मनीला भेट देण्याची संधी दिली आहे. (Europe Tour)

पॅकेजच्या खास गोष्टी

पॅकेजचं नाव – European Express Ex Lucknow (NLO19)

फिरण्याचे ठिकाण – पॅरिस (फ्रान्स), ज्यूरिख (स्वित्झर्लंड),  ब्रसेल्स (बेल्जियम), फ्रँकफर्ट (जर्मनी),  ॲमस्टरडॅम (नेदरलँड्स) आणि पॅरिस (फ्रान्स)

टूरचा कालावधी – 13 दिवस आणि 12 रात्र

टूरची तारीख – 29 मे 2024

क्लास – कंफर्ट

जेवनाची सोय – सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवन आणि रात्रीचं जेवन

पॅकेजसाठी किती रूपये मोजावे लागणार

पॅकेजची सुरुवात 3,05,400 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. एकाच व्यक्तीसाठी बुकिंग करत असाल तर तुम्हाला 3,67,800 रूपये खर्च करावे लागू शकतात. तुम्ही 2 लोकांसाठी बुकिंग करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्तीला 3,06,100 खर्च करावे लागतील. तसेच तीन व्यक्तींसाठी प्रति व्यक्तीला 3,05,400 रूपये खर्च आहे. (Europe Tour)

आयआरसीटीसीच्या पॅकेज बुकिंगसाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. पॅकेजशी संबंधित माहितीसाठी तुम्ही 8287930922 / 8287930902 वर संपर्क करु शकता.

News Title – Europe Tour 5 Country 13 Day 12 Night

महत्त्वाच्या बातम्या

‘आम्ही मित्रच…’; अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन

यंदाची निवडणूक जिंकणार का?, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

वाढदिवसादिवशी ऑनलाईन केक मागवला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या बँकेत मोठा घोटाळा

काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, कारचा चक्काचूर, एकाच कुटुंबातील…