उन्हाच्या झळा वाढल्या, उष्माघातापासून ‘असा’ करा स्वतःचा बचाव

Protection against heatstroke

Protection against heatstroke | राज्यात तापमानात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. काही भागात उष्णतेच्या लाटा वाहत आहेत तर कुठे मुसळधार पाऊस बरसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत रविवारी अवकाळी पाऊस झाला. तर, मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भात उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमान 42 अंश सेल्सियसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. सोलापुरात राज्यात सर्वाधिक 41 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. जळगाव, बीड, अकोला, चंद्रपूरमध्येही पारा चाळिशीपार गेला होता. राज्याच्या बहुतेक भागांत कमाल तापमानात घट झाली असली तरीही किमान तापमान 25 अंश सेल्सिअवर कायम आहे.

आता तर सकाळी आणि रात्रीही उष्णता वाढली आहे. अकोल्यामध्ये देशातील सर्वाधिक 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उन्हामुळे मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये उष्माघतामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राधेश्याम कुलकर्णी (30 वर्षे वय) असं या तरुणाचं नाव आहे. त्यामुळे घराबाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचं
आवाहन करण्यात आलं आहे.

उष्माघाताची कारणे कोणती?

उन्हात अधिक वेळ काम करणे किंवा उन्हाळ्यात इतर मजुरीची कामे करणे.
कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काचेच्या कारखान्यात काम करणे.
उच्च तापमान खोलीत काम करणे.
यासोबतच खूप डार्क आणि घट्ट कपडे घातल्याने उष्णता अधिक जाणवते.

उष्माघाताची लक्षणे काय?

उष्माघात झाल्यास थकवा, ताप, कोरडी त्वचा, भूक न लागणे, चक्कर येणे, नैराश्य, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता, बेशुद्धी आणि अस्वस्थता ही लक्षणे दिसून येतात.

उष्माघातावरील उपचार:

उष्माघात झालेल्या रुग्णाला (Protection against heatstroke) थंड वातावरण असलेल्या खोलीत ठेवावे. रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ घाला. रुग्णाच्या कपाळावर थंड पाणी ठेवावे, बर्फाचा पॅक लावावा. अधिक त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

‘असा’ करा स्वतःचा बचाव

प्रत्येक तासाला पाणी प्या. कुठे बाहेर जाताना पाणी सोबत असू द्या. शक्यतो हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री वापरा. बुटांऐवजी चप्पल वापरा. उन्हात जाताना टोपी/हॅटखाली ओलसर कपडा ठेवा. पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

उन्हात कष्टाची (Protection against heatstroke) कामे करू नका. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिक्स टाळा. शिळे अन्न खाऊ नका. सीझन फ्रुट्स म्हणजेच संत्री, मोसंबी, टरबूज अधिक खा. काकडीचे सेवन करा. डिटोक्स वॉटर म्हणजेच पुदिना, लिंबू, अद्रक पाण्यात टाकून ते पाणी प्या. यामुळे तुमचे शरीर थंड राहील.

News Title- Protection against heatstroke
महत्त्वाच्या बातम्या –

चुकूनही ‘या’ दिवशी नखे कापू नयेत; अन्यथा या गोष्टींचा करावा लागेल सामना

‘पलटूराम शेवटी आपला आवाका दाखवला’; शिवतारेंना कार्यकर्त्यांनी सुनावलं

कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार; SSC मध्ये तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

वर्कआउट दरम्यान ‘या’ चुका पडू शकतात महागात; अशी घ्या काळजी

अरे भाऊ म्युच्युअल फंड म्हणजे काय रे? अन् त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .