“जर तुम्हाला वहिनी आईसमान वाटते तर निवडणूक नका लढवू”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणुक जवळ आली आहे. यंदा राज्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघ अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे. पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार आहे. या लढतीकडे केवळ राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. काल-परवा सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार असतील, अशी घोषणा केली.

“भावाची बायको म्हणजेच वहिनी ही आईसमान”

त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात जात दौरा केला. त्यांनी मतदारांची भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत असताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला असून त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलत असताना आईची उपमा दिली आहे. मोठ्या भावाची बायको म्हणजेच वहिनी ही आईसमान असते. आता तर भाजपने घरफोडून आमच्याच आईला आमच्याविरोधात लढायला सांगितलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

भाजपला शरद पवार यांचा पराभव करायचा आहे. पण शरद पवार यांच्या ताकदीचा नेता सापडत नसल्याने भाजपने घरातील व्यक्ती दिला असून घरफोडी केलं. भाजप घरफोड्या आहे. आमच्याच घरातील व्यक्ती विरोधात देऊन राजकारण करणं भाजप हेच करतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर आता भाजप नेत्यांनी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या व्यक्तव्यावर पलटवार केला आहे.

भाजप नेत्याचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

“आपली मोठी वहिनी आई असल्याचं सुप्रिया सुळे सांगत आहेत. ताई महाराष्ट्राच्या जनतेला माहितीये, राज्यात फोडाफोडीचं राजकारण करणारा नेता कोण आहे? ज्या राज्यामध्ये ज्यानं अनेक घरं फोडली, तो घरफोड्या कोण? हे महाराष्ट्राला महितीये. जर तुम्हाला वहिनी आईसमान वाटते तर निवडणूक नका लढवू,” असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

“तुम्ही आईला समर्थन दिलं पाहिजे. एका बाजूला आईला समर्थन द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला भावनिक माहोल करायचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे”, असं प्रवीण दरेकर म्हणाले. “निवडणुकीमध्ये देशातील मतदारसंघाच्या प्रश्नावर बोललं पाहिजे. देशातल्या प्रश्नावर बोललं पाहिजे, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

“अजित पवार यांचं कर्तुत्व मोठं आहे. त्यांच्या विकासकामांना आव्हान देता येत नाही. त्यांचे विकासकाम डोंगराएवढे आहे. अजितदादाला वाऱ्यावर सोडलंय. कुटुंबानं त्यांना एकटं पाडलंय, याचं बारामतीकरांना वाईट वाटतंय,” असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

News Title – Baramati Lok Sabha BJP Leader Pravin Darekar Slam to Supriya Sule About Sunetra Pawar

महत्त्वाच्या बातम्या

चुकूनही ‘या’ दिवशी नखे कापू नयेत; अन्यथा या गोष्टींचा करावा लागेल सामना

‘पलटूराम शेवटी आपला आवाका दाखवला’; शिवतारेंना कार्यकर्त्यांनी सुनावलं

कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार; SSC मध्ये तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

वर्कआउट दरम्यान ‘या’ चुका पडू शकतात महागात; अशी घ्या काळजी

अरे भाऊ म्युच्युअल फंड म्हणजे काय रे? अन् त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी