एकनाथ शिंदेंना धक्का?, ‘हा’ बडा नेता शरद पवार गटात जाणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Madha Lok sabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या जागावाटपाची यादी समोर आली आहे. निवडणुकांच्या तारखा देखील समोर आल्या असून आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

माढा लोकसभा (Madha Lok sabha) मतदारसंघातून स्वत: शरद पवार लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र शिंदे गटातील बड्या नेत्यानं शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्याभेटी मागे आता माढा लोकसभा (Madha Lok sabha) मतदारसंघाचा प्रश्न सुटणार असल्याची चर्चा आहे. इतर काही नेत्यांनी माढा लोकसभा (Madha Lok sabha) मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. अशातच आता शिंदे गटातील नेते लवकरच शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असून माढा लोकसभा (Madha Lok sabha) मतदारसंघातून त्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

शिंदे गटाचे नेते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार

शिंदे गटाचे नेते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहे. शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे असं त्यांचं नाव आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश होणार आहे.

संजय कोकाटे विधानसभा लढणार?

“माढा मतदारसंघातून बबनराव शिंदेंविरोधात मी विधानसभा लढणार आहे. माढातील जुलमी आणि भ्रष्टाचारी राजवट घालवण्यासाठी मी लढा उभारला आहे. माढा लोकसभेला तुतारी चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करणार आहे,” असं संजय कोकाटे म्हणाले आहेत.

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड शरद पवार यांच्या भेटीस

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दिल्ली येथे प्रवीण गायकवाड आणि शरद पवार यांच्यात भेट झाली. त्यानंतर शरद पवार यांनी निवडणुकीच्या तयारीला लागा, असं प्रवीण गायकवाड यांना सांगितलं असल्याची माहिती समोर आली. 3 तारखेला माढा मतदारसंघाचा तिढा सुटणार असल्याची चर्चा आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीनं जोर लावला आहे. माढा या जागेवर विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडीनं आपल्या बाजूनं ताकद लावली आहे. शरद पवार आता स्वत: माढा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहे.

Solapur Madha Pravin Gaikwad Meet Sharad Pawar in Delhi For Loksabha Election 2024 Latest Marathi News

News Title – Madha Loksabha Election In Shinde Group Leader Will Enter In Sharad pawar Party

महत्त्वाच्या बातम्या

चुकूनही ‘या’ दिवशी नखे कापू नयेत; अन्यथा या गोष्टींचा करावा लागेल सामना

‘पलटूराम शेवटी आपला आवाका दाखवला’; शिवतारेंना कार्यकर्त्यांनी सुनावलं

कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार; SSC मध्ये तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

वर्कआउट दरम्यान ‘या’ चुका पडू शकतात महागात; अशी घ्या काळजी

अरे भाऊ म्युच्युअल फंड म्हणजे काय रे? अन् त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी