कमी बजेटमध्ये साजरी करा उन्हाळ्याची सुट्टी; या ठिकाणांना अवश्य भेट द्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Summer Toruist Place l भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे भेट देण्यासाठी दोन ते तीन दिवसांची सुट्टी पुरेशी आहे. शनिवार-रविवारी सुट्टी मिळाली असेल तर या अशा काही ठिकाणांना भेट द्या की तिथे तुमचा मूड फ्रेश होईल. याशिवाय तिथे खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. मात्र अशी ठिकाण नेमकी कोणती आहेत हे आपण आज जाणून घेऊयात…

मुक्तेश्वर :

कमी बजेटमध्ये दोन ते तीन दिवसांची सुट्टी घालवण्यासाठी मुक्तेश्वर हे उत्तम ठिकाण आहे. मुक्तेश्वर हे उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात आहे. हे ठिकाण विशेषतः साहसी ऍक्टिव्हिटी साठी प्रसिद्ध आहे. येथे येऊन तुम्ही रॅपलिंग, रॉक क्लाइंबिंग, ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय मुक्तेश्वर मंदिर पाहण्यासाठी अतिशय सुंदर आहे.

Summer Toruist Place l पालमपूर :

हिमाचल प्रदेशातील पालमपूर हे कमी बजेट प्रवासासाठी अतिशय सुंदर आणि उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी दोन ते तीन दिवस पुरेसे आहेत. तुम्ही चहाच्या बागा पाहण्यासाठी पालमपूरला भेट देऊ शकता. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर कारेरी तलाव देखील आहे. याशिवाय तुम्ही बीरमध्ये येऊन पॅराग्लायडिंगचा अनुभव घेऊ शकता.

टिहरी :

उत्तराखंडमधील धनौल्टी येथून आणखी काही तासांचा प्रवास करून तुम्ही टिहरीला पोहोचू शकता. मित्रांसोबत मजा करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही अनेक साहसी उपक्रमांचा अनुभव घेऊ शकता. निवासासाठी, तरंगत्या झोपड्या देखील आहेत. ज्यामुळे तुम्हाला मालदीवमध्ये असल्यासारखे वाटते. धनौल्टीहून टिहरीला जाताना तुम्ही कनाटलला देखील जाऊ शकता.

शिमला-मनाली :

शिमला-मनाली लाँग वीकेंडसाठी उत्तम ठिकाण आहेत. येथे वीकेंडमध्ये बरेच लोक येथे जातात त्यामुळे हॉटेलपासून खाण्यापर्यंत सर्व काही महाग आहे. मनाली नंतर तुम्ही गोशाल गावात देखील जाऊ शकता, ते मनालीपासून फक्त अवघ्या 4 किमी अंतरावर आहे. या गावात तुम्हाला बर्फाच्छादित टेकड्या आणि सफरचंदाच्या बागांचे दृश्य पाहायला मिळेल.

News Title- Summer Toruist Place

महत्त्वाच्या बातम्या –

“मला निवडून दिलं तर मी प्रत्येक गावात बिअर बार सुरू करेन”

चुकूनही ‘या’ दिवशी नखे कापू नयेत; अन्यथा या गोष्टींचा करावा लागेल सामना

‘पलटूराम शेवटी आपला आवाका दाखवला’; शिवतारेंना कार्यकर्त्यांनी सुनावलं

कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार; SSC मध्ये तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

वर्कआउट दरम्यान ‘या’ चुका पडू शकतात महागात; अशी घ्या काळजी