“मला निवडून दिलं तर मी प्रत्येक गावात बिअर बार सुरू करेन”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Loksabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आपापला प्रचार करत आहे. चंद्रपूर लोकसभा (Loksabha Election 2024) मतदारसंघामध्ये एका उमेदवाराने प्रचार करत असताना हद्द पार केली आहे. चंद्रपूर लोकसभा (Loksabha Election 2024) मतदारसंघातील उमेदवाराने जर मी निवडून आली तर कमी किंमतीत दारू उपलब्ध करून देईल, असं आश्वासन दिलं आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे. (Loksabha Election 2024)

प्रचार करत असताना उमेदवार कधी कोणतं आश्वासन देतील याचा काही नेम नाही. निवडणूक लढण्यासाठी उमेदवार वाटेल ते करतात. लोकसभा निवडणूक 2024 चा प्रचार सुरू झाला आहे. एका महिला उमेदवाराने विचित्र आश्वासन दिलं आहे. त्या आश्वासनाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. वनिता राऊत असं त्यांचं नाव असून अखिल भारतीय मानवता पार्टीच्या सदस्या आहेत. त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. “मी जर जिंकून आली तर कमी किंमतीत दारू उपलब्ध करून देईल”, असं त्या म्हणाल्या आहेत.

“जिथ गाव, तिथं बिअर बार”

“मी लोकसभा निवडून आली, तर प्रत्येक गावात बिअर बार उघडणार, सोबत खासदार निधीतून परदेशी दारू आणि बिअर उपलब्ध करून देईल”, असं वनिता राऊत यांनी म्हटलं आहे. “जिथ गाव, तिथं बिअर बार”, असा प्रचार सध्या वनिता राऊत करत आहेत. रेशनिंगच्या माध्यमातून परदेशी दारू उपलब्ध करून देईल. पिणाऱ्यांना आणि विक्रेत्यांकडे परवाना आवश्यक असेल.

वनिता राऊत आपल्या मुद्द्यांना समर्थन करत सांगतात की, “खूप गरीब लोकांना दारू पिण्यासाठी समाधान मिळतं. त्यांना बिअर परवडत नाही. त्यांना देशी दारूवरून समाधान मानावं लागतं. मला त्यांना परदेशी दारूचा आनंद घेऊन द्यायचा आहे.”

2019 मध्ये राऊत यांनी निवडणूक लढवली

वनिता राऊत यांची निवडणूक लढण्याची पहिली वेळ नाही. त्याआधी 2019 मध्ये देखील लोकसभा निवडणूक लढवली होती. तसेच याचवर्षाी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी देखील हेच आश्वासन दिलं होतं. त्यावेळी त्यांनी केलेल्या अशाच प्रचारामुळे निवडणूक अधिकाऱ्याने डिपॉझिट जप्त केलं होतं.

News Title – Loksabha Election 2024 Unique Campaign

महत्त्वाच्या बातम्या

CSK ची हार पण धोनीचा भारी ‘पंच’, चाहत्यांचा एकच जल्लोष; ठरला ऐतिहासिक सामना

धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-20 मध्ये असं करणारा बनला जगातील पहिला खेळाडू

WHAT A CATCH! अद्भुत अविश्वसनीय; CSK च्या शिलेदाराचा अप्रतिम झेल, Video

“हिंमत असेल तर पक्षाच्या बॅनरवर ईडी, सीबीआयचे फोटो लावा”, उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले

बाबरला पुन्हा कर्णधार बनवल्याने शाहिद आफ्रिदी संतापला, जावयाला डच्चू!