मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांच्या गाडीचा ताफा अडवला अन्…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ashok Chavan | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राज्यभर नेते, कार्यकर्ते आणि उमेदवार गावोगावी जात प्रचार करत आहेत. नुकताच काँग्रेसमधून भाजपमध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रवेश केला. प्रचारासाठी अशोक चव्हाण एका गावामध्ये दाखल झाले तेव्हा मराठा बांधवांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला होता.

अनेक महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सामावून घेण्यासाठी आंदोलन, उपोषण करत आहेत. त्यांनी काही दिवसांआधी खळबळजनक दावा केला होता. मराठा समाजाच्या एकातरी उमेदवाराने निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. मात्र आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. जो सगेसोयरे अंमलबजावणीला विरोध करत आहे त्याला पाडा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. (Ashok Chavan)

मराठा समाजाला सरकारने 13 टक्के आरक्षण दिलं होतं. मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं आहे. मात्र सरकार ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणार नसल्याचं सांगत आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता आरक्षण देण्यात येईल, असं सरकार म्हणत आहे. मात्र मराठा समाजही सरकारचं ऐकत नाही. याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

मराठा बांधवांनी अशोक चव्हाण यांच्या गाडीला घेरलं

काही दिवसांआधी प्रणिती शिंदे यांना मराठा समाजाच्या बांधवांनी घेरलं होतं. त्यावेळी प्रणिती शिंदे यांना रोषाला सामोरं जावं लागलं होतं. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील गावामध्ये भाजप नेते अशोक चव्हाण गेले होते. त्यावेळी मराठा बांधवांनी त्यांच्या गाडीला घेरलं. मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देखील दिल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्ती करत घेराव सोडवण्याचा प्रयत्न केला आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी तिथून पुन्हा परतीचा प्रवास करण्याचा मार्ग निवडला.

“अशोक चव्हाण भाग गया…”

अशोक चव्हाण प्रचारासाठी आले असताना त्यांना मराठा बांधवांचा आक्रोश पाहून आपली गाडी पुन्हा वळवली. त्यावेळी अशोक चव्हाण हे तिथून निघून गेले. यावेळी मराठा बांधवांनी पुन्हा एकदा नारेबाजी केली. भाग गया रे, भाग गया, अशोक चव्हाण भाग गया…, असा नारा मराठा बांधवांकडून लावण्यात आला.

भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलिकर यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण आले होते. मात्र मराठा बांधवांनी संताप व्यक्त केल्याने त्यांना तिथून जाण्यास मराठा समाजातील बांधवांनी भाग पाडलं आहे.

 News Title – Ashok Chavan Against Maratha protestor At Nanded

महत्त्वाच्या बातम्या

“कितीबी समोर येऊदे त्यांना…”, सुप्रिया सुळेंचं व्हॅट्सअॅप स्टेटस चर्चेत

“मी ईडीबिडीला घाबरत नाही…”, प्रणिती शिंदे पुन्हा कडाडल्या

IRCTC चं सर्वात भारी टूर पॅकेज; ‘5’ देश फिरा स्वस्तात

उन्हाच्या झळा वाढल्या, उष्माघातापासून ‘असा’ करा स्वतःचा बचाव

“जर तुम्हाला वहिनी आईसमान वाटते तर निवडणूक नका लढवू”