मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक! हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर, रोहितच्या कृतीनं मन जिंकलं, Video

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Indians | रोहित शर्मा म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक कर्णधार… रोहितच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला. पण, आयपीएल 2024 चा हंगाम रोहितसह त्याच्या चाहत्यांसाठी खूप वेगळा आहे. कारण मुंबई इंडियन्सचा संघ इतिहासात प्रथमच हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात खेळत आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला हे पद देण्यात आले. पण, फ्रँचायझीचा हा निर्णय चाहत्यांना खटकला अन् त्याचा प्रत्यय मुंबईच्या प्रत्येक सामन्यात पाहायला मिळत आहे. (IPL 2024 News)

मुंबईचा कर्णधार बनल्यामुळे हार्दिक पांड्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला. रोहितला या पदावरून काढल्यामुळे त्याचे चाहते संतापले आहे. मुंबईने आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आपले सुरुवातीचे 3 सामने गमावले. सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. मुंबईने यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना आपल्या घरच्या स्टेडियमवर खेळला. पण, हार्दिकच्या नेतृत्वातील मुंबईला सलग तिसरा पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानने 6 गडी आणि 27 चेंडू राखून विजय मिळवला.

IPL 2024 चा थरार

नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या यजमान मुंबईसाठी ट्रेंन्ट बोल्ट काळ ठरला. त्याने रोहित शर्मा आणि नमन धीर यांना दोन चेंडूत बाहेरचा रस्ता दाखवला. बोल्टच्या घातक गोलंदाजीने मुंबईच्या फलंदाजीची कंबर मोडली. अखेर मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 बाद केवळ 125 धावा करू शकला.

तत्पुर्वी, ट्रेन्ट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांनी मुंबईच्या फलंदाजांची बोलती बंद केली. या जोडीने प्रत्येकी 3-3 बळी घेण्याची किमया साधली. तर नांद्रे बर्गरला (2) आणि आवेश खानला (1) बळी घेण्यात यश आले. मुंबईकडून कर्णधार हार्दिकने सर्वाधिक ३४ धावा केल्या, तर तिलक वर्मा (३२), रोहित शर्मा (०), नमन धीर (०), इशान किशन (१६), पियुष चावला (३), टीम डेव्हिड (१७), गेराल्ड कोएत्झी (४), जसप्रीत बुमराह (नाबाद ८ धावा) आणि आकाश मधवालने नाबाद (४) धावा केल्या.

Mumbai Indians चा पराभव

मुंबईने दिलेल्या 126 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या राजस्थानने सहज लक्ष्य गाठले. राजस्थानने 15.3 षटकांत 4 बाद 127 धावा करून आपला विजयरथ कायम ठेवला. राजस्थानकडून रियान परागने 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 39 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी केली.

 

दरम्यान, मुंबईचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना चाहते ‘रोहित रोहित’ अशा घोषणा देताना दिसले. काही अतिउत्साही चाहत्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल करताना त्याच्याविरोधात घोषणा दिला. यावेळी क्षेत्ररक्षण करत असलेल्या रोहितने चाहत्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. हिटमॅनच्या या कृतीचे कौतुक होत आहे.

मुंबईचा संघ –

हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.

राजस्थानचा संघ –

संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

News Title- IPL 2024 MI vs RR Hardik Pandya’s Mumbai Indians defeated by Rajasthan Royals
महत्त्वाच्या बातम्या –

हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?

रोहितचा फॅन थेट मैदानात शिरला; हिटमॅनलाही धक्का बसला, सर्वांची उडाली धांदल, Video

‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची घोषणाबाजी

आचार्य चाणक्यांनी सांगितल्या प्रमाणे करा दिवसाची सुरुवात; होईल फायदाच फायदा

मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांच्या गाडीचा ताफा अडवला अन्…