अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढल्या; मतदारसंघातील ‘त्या’ बॅनरने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी मतदार निश्चित झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आता प्रचारही सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवरच शिरूरचे खासदार अमोल कोल्हे चर्चेत आले आहेत. त्यांच्याविरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. एक सुज्ञ मतदार असं म्हणत बॅनर लावण्यात आले आहेत. कोल्हे यांना याद्वारे तिखट प्रश्न करण्यात आले आहेत. पाच वर्षे कुठे होतात, असा सवालच या बॅनरमधून केला आहे.

अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील लढणार आहेत. तर, कोल्हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरूवात केली आहे. पण, गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत, अन् आता प्रचारासाठी मतदारसंघात येत आहेत, अशी नाराजी आता नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

अमोल कोल्हे विरोधात बॅनर

म्हणूनच कोल्हे यांना सवाल करणारे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. अमोल कोल्हे हे आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात प्रचार करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या (Lok Sabha Election 2024 ) विरोधात पोस्टर लागलेले पाहायला मिळाले.

विद्यमान खासदार साहेब पाच वर्ष तुम्ही कुठे होता. कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता.पाच वर्षे मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला? खासदार साहेब उत्तर द्या एक सुज्ञ मतदार, अशा आशयाचे बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

“शरद पवारांच्या नावाने मतं…”

दरम्यान, महायुतीचे (Lok Sabha Election 2024 ) उमेदवार आढळराव पाटील यांनीही अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. अमोल कोल्हे शरद पवारांचं नाव घेऊनच प्रचार करत आहेत. त्यांचं नाव सोडून कोल्हेंकडे दुसरं भांडवलंच नाही. शरद पवारांसोबत निष्ठा ठेवून उभा आहे, असे सांगुन मत मागणार असाल पण शरद पवारांची गोष्ट वेगळी आहे. आता त्यांच्या नावाने मत मागण्याचे तुमचे दिवस गेलेत, अशी टीका आढळराव पाटील यांनी केली आहे.

News Title- Lok Sabha Election 2024 Banner Against Amol Kolhe

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक! हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर, रोहितच्या कृतीनं मन जिंकलं, Video

हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?

रोहितचा फॅन थेट मैदानात शिरला; हिटमॅनलाही धक्का बसला, सर्वांची उडाली धांदल, Video

‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची घोषणाबाजी

आचार्य चाणक्यांनी सांगितल्या प्रमाणे करा दिवसाची सुरुवात; होईल फायदाच फायदा