पुणेकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | एप्रिल महिन्यात तापमान अधिक वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तर महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेची लाट येणार आहे. उष्णता वाढली तशी पाण्याचीही कमतरता आतापासूनच जाणवत आहे. आता पुण्यात काही भागांमधील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

पुण्यात गुरुवारी म्हणजेच 4 एप्रिलरोजी काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना भर उन्हाळ्यात पाणी जपून वापरावं लागणार आहे. पुणे महापालिकेने बाणेर, बालेवाडी, कोथरूड, कात्रज आणि विमाननगर सह काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचं म्हटलं आहे.

जलवाहिन्यांमधील नियोजित विद्युत दुरुस्तीमुळे या गुरुवारी पाणीकपात केली जाणार आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्र, चांदणी चौक पाण्याची टाकी, पॅनकार्ड क्लब पाण्याची टाकी आणि भामा आसखेड प्रकल्पातील कामांमुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

‘या’ भागांतील पाणीपुरवठा बंद राहील

पाषाण, बावधन, सुस रोड, सुतारवाडी, वारजे माळवाडी, काकडे सिटी परिसर, महात्मा सोसायटी, बाणेर, बालेवाडी, करवेंगार, वारजे, कात्रज, कोंढवा, खादी मशीन चौक, लोहगाव, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, धानोरी, खराडी, रामटेकडी, सोलापूर रोड, कोरेगाव पार्क, फुरसुंगी आणि हडपसरचा काही भागात पाणी नसणार आहे. त्यासोबतच पाषाण, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, बावधन परिसर, उजवी आणि डावी भुसारी काॅलनी, चिंतामणी सोसायटी, पाषाण, परमहंसनगर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, सूस रस्ता, कुंभारवाडी टाकी, सिप्ला फाउंडेशन, रेणुकानगर, हिल व्ह्यू सोसायटी, पॉप्युलरनगर, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाउनशिप, एकलव्य कॉलेज (Pune News) परिसर

कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, कांचन गंगा, अलकनंदा सोसायटी, सहजानंद, किर्लोस्कर कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, पुणे-मुंबई बाह्यवळणाच्या दोन्ही बाजू, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर गावठाण, गोसावी वस्ती, बाणेर, बालेवाडी, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपाॅईंट रस्ता, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर, कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम, सोसायटी, शाहू काॅलनी, वारजे जकात नाका, गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, कोथरूड, वडार वस्ती, हॅपी काॅलनी, डहाणूकर काॅलनी, सुतारदरा, किष्किंधानगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, आयडीयल काॅलनी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, वैदूवाडी, भोसलेनगर, खैरेवाडी, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, हनुमाननगर, जनवाडी, संगमवाडी, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, गोकुळनगर पठार या भागाचा पाणीपुरठा बंद राहणार आहे. तसेच हिंगणे, आनंदनगर, माणिकबाग, दामोदरनगर, विश्रांतीनगर, वडगाव बुद्रुक, मीनाश्री पुरम, कात्रज आगम मंदिर परिसर, बालाजीनगर, दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोषनगगर, दत्तनगर, आंबेगाव रस्ता

सुखसागरनगर, धनकवडी, आंबेगाव पठार, संतोषनगर, जांभूळवाडी रस्ता, धनकवडी गावठाण परिसरा, तळजाई परिसर, सहकारनगर भाग १ आणि २, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, सुखसागरनगर भाग 1 आणि 2, कात्रज-कोंढवा रस्ता, गोकुळनगर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकर नगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, खडी मशिन परिसर, लोहगाव, विमाननगर, वडगावशेरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी, खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, थिटे वस्ती, तुकारामनगर, चंदननगर, रामटेकडी, सय्यदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, साडेसतरा नळी, महंमदवाडी, हांडेवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची, खडकी, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर या भागाचा पाणीपुरठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

News Title- Pune News Water supply will be off on April 4

महत्त्वाच्या बातम्या –

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; PF नियमांत झाला मोठा बदल

“2 कोटींची गाडी अन् 17 रूपयांची साडी…,”; बच्चू कडू नवनीत राणांवर संतापले

जेईई परीक्षा 2024 प्रवेशपत्र जारी; परीक्षेला जाण्यापूर्वी ‘हे’ मार्गदर्शक तत्त्वे नक्की वाचा

बंगळूरुसमोर आज लखनऊचं आव्हान; कोण मारणार बाजी?

अत्यंत महत्त्वाची बातमी; एमपीएससीने घेतला मोठा निर्णय