“2 कोटींची गाडी अन् 17 रूपयांची साडी…,”; बच्चू कडू नवनीत राणांवर संतापले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Navneet Rana | प्रहार जनशक्तीचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये अंतर्गत कुरघोडी पाहायला मिळत आहे. आता बच्चू कडू हे महायुतीविरोधात लढत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा (Navneet Rana) यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. मात्र आता बच्चू कडू यांनी लोकसभेसाठी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याबाजूनं प्रचार करणार नसल्याचं सांगितलं आहे.

परभणीतून बच्चू कडूंनी प्रहार जनशक्ती पक्षातून आपला उमेदवार दिला आहे. दिनेश बाबू असं उमेदवाराचं नाव असून बच्चू कडूंनी राणांवर हल्ला चढवला आहे. यामुळे सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. (Navneet Rana)

“17 रूपयांची साडी.., 2 कोटींची गाडी”

प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. “17 रूपयांची साडी घेऊन मेळघाटची बेइज्जती केली. आपण 2 कोटींच्या गाडीतून फिरायचं. लोकांना 17 रूपयांच्या साडीने गुलामीकडं न्यायचं. 17 रूपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही. मेळघाट येथे वाटलेल्या साड्यांवर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. नवनीत राणांचं (Navneet Rana) डिपॉझिट आम्ही जप्त करणार आहोत. आता तीर दूर गेलेला आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

“राणांच्या उमेदवारीवर कोणीही नाराज नाही”

राणांचं जातप्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा अनेकदा बच्चू कडू यांनी केला होता. भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणांच्या उमेदवारीवर कोणीही नाराज नसल्याचं सांगितलं आहे. आमचे कार्यकर्ते काहीही बोलणार नाहीत. आमचे उमेदवार येतील. महायुतीचे उमेदवार 50 टक्क्यांपेक्षा अधिक मताने विजयी होतील, असं ते म्हणालेत.

आमदार बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत. एकनाथ शिंदे यांचा भाजपशी संबंध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिढा सोडवण्यासाठी सांगू. त्यानंतर बच्चू कडूंनी ऐकलं तर ठिक. नाहीतर मतदार निर्णय घेतील, असं बावनकुळे म्हणाले.

महायुतीतील उमेदवाराविरोधात बच्चू कडूंनी आपल्या प्रहार पक्षाचा उमेदवार दिला आहे. त्यांनी अमरावतीमध्ये जागोजागी जात प्रचारास सुरूवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत.

News Title – Navneet Rana Against Bachchu Kadu

महत्त्वाच्या बातम्या

उद्या भारतात दिग्गज ऑटो कंपन्यांशी तगडी स्पर्धा होणार; SUV Taisor लाँच होणार

एप्रिल महिन्यात तापमान कसं असणार?, हवामान विभागाची मोठी अपडेट समोर 

जाणून घ्या IPL च्या 10 टीमचे मालक कोण आहेत? अन् त्यांची संपत्ती

मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक! हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर, रोहितच्या कृतीनं मन जिंकलं, Video

हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?