नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; PF नियमांत झाला मोठा बदल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PF New Rules l सरकारी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ने पीएफ नियमात एक मोठा बदल केला आहे. या बदलामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर आज आपण जाणून घेऊयात EPFO ने नियमात काय बदल केला आहे.

PF New Rules l 1 एप्रिल 2024 पासून नवीन नियम लागू :

भविष्य निर्वाह निधीशी संबंधित नवीन नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू झाले आहेत. या महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या या नियमाचा पीएफ ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांना आतापर्यंत नोकरी बदलताना तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेले पैसे ट्रान्सफर करावे लागायचे. याआधी त्यासाठी एक फॉर्म भरून जमा करावा लागणार होता. पण आता त्याचे नियम बदलले आहेत.

मात्र आता पीएफ ट्रान्सफरचा त्रास संपला आहे. आतापासून नोकऱ्या बदलल्यावर पीएफ आपोआप ट्रान्सफर होईल. म्हणजेच PF ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्म 31 भरण्याची गरज नाही. तुम्ही आर्थिक वर्ष 2025 पासून तुमची नोकरी बदलल्यास, तुमचे पीएफ खाते आपोआप दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरित केले जाणार आहे. यामुळे पीएफ खातेधारकांचे काम अधिक सोपे होणार आहे.

PF New Rules l वेतनाच्या 12 टक्के योगदान मिळते :

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमानुसार, कर्मचाऱ्यांना पीएफसाठी त्यांच्या मुळ वेतनातील 12 टक्के योगदान द्यावे लागते. या खात्यासाठी कंपनीला नियोक्त्याला देखील योगदान द्यावे लागते. त्यामुळे भविष्य निधी म्हणजे पीएफ (Provident Fund) गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे.

तसेच आजकाल सर्वच कर्मचारी पीएफमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. ही गुंतवणूक कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरते .

News Title- PF New Rules Changed

महत्त्वाच्या बातम्या –

“2 कोटींची गाडी अन् 17 रूपयांची साडी…,”; बच्चू कडू नवनीत राणांवर संतापले

जेईई परीक्षा 2024 प्रवेशपत्र जारी; परीक्षेला जाण्यापूर्वी ‘हे’ मार्गदर्शक तत्त्वे नक्की वाचा

बंगळूरुसमोर आज लखनऊचं आव्हान; कोण मारणार बाजी?

अत्यंत महत्त्वाची बातमी; एमपीएससीने घेतला मोठा निर्णय

‘या’ कारणामुळे राजकारणी लोक Iphone वापरतात; अरविंद केजरीवालांचा आयफोन चर्चेत