अजित पवार यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nilesh Lanke | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राज्याचं लक्ष लोकसभा निवडणुकीकडे लागलं आहे. यंदा राज्याच्या राजकारणातील चित्र विचित्र झालेलं पाहायला मिळालं. पवार कुटुंबामध्ये उभी फूट पडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड केलं. त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत काही आमदार देखील होते. त्यामध्ये माजी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचा देखील समावेश होता. मात्र काही दिवसांआधी निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अजित पवार यांची साथ सोडली आणि शरद पवार यांचा हात पकडला आहे.

निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार गटातून भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्याविरोधामध्ये लढणार आहेत. अहमदनगरमधून निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारास सुरूवात केली आहे. त्यांचा स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे.

जयंत पाटील यांचा खळबळजनक दावा

“निलेश लंके हे अजित पवार यांच्यासोबत होते मात्र मनाने ते शरद पवार यांच्यासोबत होते. मात्र आता ते प्रत्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आले आहेत. निलेश लंके यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यासोबत इतरही अनेक नेते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार”, असा जयंत पाटील यांनी दावा केला आहे.

“महाविकास आघाडी संविधान वाचवण्याचं काम करत आहे. अनेकांनी महाविकास आघाडीमध्ये मतभेद होईल असं करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीने चांगलं वातावरण बनवलं”, असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.

“लंके यांच्यात जनतेच्या मनातील प्रश्न मांडण्याची खुबी”

“कार्यकर्त्यांमधला उत्साह पाहून नगर दक्षिणचा निकाल आजच झालाय असं वाटतंय. लोकांनी एखादा निर्णय घेतला तर जगातील कोणतेही ताकद रोखू शकत नाही. निलेश लंके यांच्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रश्न मांडण्याची खुबी आहे. सर्व घटकांना न्याय द्यायचा असेल तर निलेश लंके यांनी निवडून द्या,” असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

यावेळी बोलत असताना जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्र सोडलं आहे. “अनेकजण म्हणत आहेत की आम्ही काम कऱण्यासाठी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. जाहिरातीवरील खर्च पाहिल्यावर त्यांची मिळकत काय असेल याचा तुम्ही विचार करा. इलेक्ट्रोल बॉण्ड म्हणजे मोठा भ्रष्टाचार आहे. या देशात बेरोजगारी वाढली आहे. उच्चशिक्षित तरूण शिपायांच्या नोकऱ्या मिळाव्या म्हणून नोकरीसाठी रांगेत उभे राहत आहेत”, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला धारेवर धरलं आहे.

 News title – Nilesh Lanke Ahmednagar Lok Sabha At Jayant Patil Big Statement

महत्त्वाच्या बातम्या

‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची घोषणाबाजी

आचार्य चाणक्यांनी सांगितल्या प्रमाणे करा दिवसाची सुरुवात; होईल फायदाच फायदा

मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांच्या गाडीचा ताफा अडवला अन्…

‘या’ गोष्टीमुळे हवामान विभागाला वातावरणाचा अंदाज समजतो!

मोठी बातमी! चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात