उष्णतेची लाट येणार?, हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. एवढंच नाहीतर दिवसेंदिवस राज्याच्या तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. काही शहरांमध्ये 40% तापमान असून काही भागात 40% पारा ओलांडला आहे. त्यामुळे गर्मी आणि घामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र आता लोकसभा निवडणूक देखील तोंडावर आल्या असून सभा, मोर्चा देखील सुरु झाले आहेत. दरम्यान निवडणुकीचा प्रचार जसजसा वाढणार आहे. तसतसा उन्हाचा पारा वाढणार असल्याचं हवमान विभागाने म्हटलं आहे.

तापमानाबाबत महत्त्वाची अपडेट

हवमान विभागाने (Weather Update) वाढत असलेल्या तापमानाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये राज्यात उन्हाचा पारा वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, ओडिशा आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुढील आठवड्यात तापमान 2 ते 5 अंशांनी वाढू शकते.

एवढंच नाही तर, एप्रिल-जून या महिन्यामध्ये भारतातील काही भागात तापमान (Weather Update) कमाल असेल. मैदानी भागांमध्ये उष्णतेची लाट सामान्यापेक्षा जास्त असेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली.

तापमान आणि निवडणूका-

दरम्यान, एप्रिल ते मे या कालावधीत लोकसभा निवडणूका होणार आहेत. महाराष्ट्रात, 19 ते 26 एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यात कमाल तापमान 2 ते 3 अंशानी वाढणार आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मतदान होणार आहे.

पुण्यातील हवामान –

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे (Weather Update pune) व परिसरात पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तर वातावरण कोरडे राहील. काल येथे 39.8 डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर 20 डिग्री सेल्सिअस एवढ्या कीमान तापमानाची नोंद झाली आहे.

New Update : weather update high temperature in April and may

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ लोकांना होईल आर्थिक लाभ, वाचा आजचं राशीभविष्य

आंबा खात असाल तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा…

अजित पवार यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर!

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; PF नियमांत झाला मोठा बदल

“2 कोटींची गाडी अन् 17 रूपयांची साडी…,”; बच्चू कडू नवनीत राणांवर संतापले