‘या’ कारणामुळे राजकारणी लोक Iphone वापरतात; अरविंद केजरीवालांचा आयफोन चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

ED on Arvind Kejriwal iPhone l मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गेल्या आठवडाभरापासून ईडीच्या कोठडीत आहेत. याप्रकरणात केजरीवाल यांना आज 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. अशातच आता केजरीवाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

ED on Arvind Kejriwal iPhone l ईडीने ॲपल कंपनीकडे घेतली मदतीची धाव :

ईडीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आयफोन उघडण्यात अडचण येत असल्याची बातमी समोर येत आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, ईडीला अरविंद केजरीवाल यांचे चार आयफोन मिळाले आहेत, परंतु केजरीवाल यांनी आयफोन बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. अशापरिस्थितीत ईडीने ॲपलकडे मदतीसाठी धाव घेतली पण कंपनीने देखील हार मानली आहे.

आयफोन वापरकर्त्यांना त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ॲपलकडून पासकोडची सुविधा दिली जाते. आयफोन वापरकर्त्याने फोनमध्ये पासकोड सेट केल्यास, डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी पासकोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. या सुरक्षा वैशिष्ट्यासह, आयफोन डेटा 256-बिट AES एन्क्रिप्शनसह एनक्रिप्टेड होतो.

पासवर्डशिवाय आयफोन अनलॉक करणे अशक्य :

आम्ही तुम्हाला सांगतो की इतर Android स्मार्टफोनच्या तुलनेत, आयफोन अनलॉक करणे अशक्य आहे, म्हणूनच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आयफोन अनलॉक करण्यासाठी ईडीने ताबडतोब ॲपलशी संपर्क साधला.

माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या आयफोन अनलॉक करण्यासाठी ईडीने अधिकृतपणे फोन निर्माता ॲपलशी संपर्क साधला होता, परंतु कोणताही डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी पासवर्ड अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी ईडीला सांगितले आहे की हा फोन जवळपास एक वर्ष त्यांच्याकडे आहे आणि 2020-2021 च्या मद्य धोरणाचा मसुदा तयार करताना ते जे उपकरण वापरत होते ते आता त्यांच्याकडे नाही. दररोज सुमारे पाच तास मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

News Title- ED on Arvind Kejriwal iPhone

महत्त्वाच्या बातम्या –

पर्पल कॅपच्या शर्यतीत युझवेंद्र चहलची धमाकेदार एन्ट्री, या टॉप 5 खेळाडूंमध्ये रस्सीखेच सुरु

“राम कदम तमाशातील नाच्याप्रमाणे…”, ठाकरे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका

उद्या भारतात दिग्गज ऑटो कंपन्यांशी तगडी स्पर्धा होणार; SUV Taisor लाँच होणार

एप्रिल महिन्यात तापमान कसं असणार?, हवामान विभागाची मोठी अपडेट समोर 

जाणून घ्या IPL च्या 10 टीमचे मालक कोण आहेत? अन् त्यांची संपत्ती