नाशिकच्या जागेवरून महायुतीत भूकंप होणार?; ‘हा’ नेता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र महायुतीला चांगलाच धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून वाद होण्याची चिन्हे आहेत. अशातच बडा नेता मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. मात्र शिंदे गटाचे इच्छुक नेते हेमंत गोडसे (Hemant Godse) वेगळी भूमिका घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हेमंत गोडसे मोठा निर्णय घेणार?

गोडसे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेणार आहेत. या भेटीत नाशिकची जागा शिवसेनेला सुटली नाही तर गोडसे अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध गोडसे यांच्यात चौथ्यांदा लढत होण्याची शक्यता आहे.

नाशिकसाठी (Lok Sabha Election 2024) गोडसे हे इच्छुक होते. त्यांचं नाव निश्चितही मानलं गेलं.पण अचानक छगन भुजबळ यांचं नाव समोर आल्याने हेंमत गोडसे आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे. गोडसे हे सलग दोन टर्म खासदार राहिले आहेत. त्यामुळे ही जागा न सुटल्यास ते अपक्षही लढू शकतात, असं म्हटलं जातंय.

छगन भुजबळ vs हेमंत गोडसे

भुजबळ आणि गोडसे यांच्यात यापूर्वी तीनवेळा सामना झाला आहे. 2009 मध्ये समीर भुजबळ यांच्याकडून 22 हजारांच्या फरकाने गोडसे यांचा प्रभाव झाला होता. पण नंतर झालेल्या दोन निवडणुकीत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ दोघांनाही धोबीपछाड करत गोडसे यांनी विजय मिळवला.

आता आगामी लोकसभा निवडणुकीतही गोडसे उभं राहण्यास इच्छुक आहेत. यासाठीच ते मुख्यमंत्री शिंदे यांची आज भेट घेणार आहेत. आजच्या भेटीत नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार काय?, याबाबत सर्वांचं लक्ष असेल.

News Title- Lok Sabha Election 2024 Chhagan Bhujbal vs Hemant Godse

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक! हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर, रोहितच्या कृतीनं मन जिंकलं, Video

हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?

रोहितचा फॅन थेट मैदानात शिरला; हिटमॅनलाही धक्का बसला, सर्वांची उडाली धांदल, Video

‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची घोषणाबाजी

आचार्य चाणक्यांनी सांगितल्या प्रमाणे करा दिवसाची सुरुवात; होईल फायदाच फायदा