पर्पल कॅपच्या शर्यतीत युझवेंद्र चहलची धमाकेदार एन्ट्री, या टॉप 5 खेळाडूंमध्ये रस्सीखेच सुरु

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Purple Cap List l आयपीएल 2024 च्या 14 सामन्यांनंतर पर्पल कॅपची शर्यत खूपच रोमांचक बनली आहे. यानंदाच्या आयपीएल मोसमातील 14 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा स्टार फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने चमकदार कामगिरी केली आहे. युजवेंद्र चहलने या दमदार कामगिरीने पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे.

IPL 2024 Purple Cap List l युझवेंद्र चहलची धमाकेदार कामगिरी :

वानखेडे स्टेडियमवर काल झालेल्या सामन्यात युझवेंद्र चहलने मुंबई इंडियन्सविरुद्ध 3 बळी घेतले आहेत. युजवेंद्र चहलने 4 षटकात केवळ 11 धावा दिल्या आहेत. यावेळी त्याने टिळक वर्मा, हार्दिक पांड्या आणि जेराल्ड कोएत्झी यांच्या विकेट्स घेतल्या आहेत. यासह युझवेंद्र चहलने आयपीएल 2024 मध्ये 6 विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

या सामन्यात युझवेंद्र चहलशिवाय वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनेही अप्रतिम कामगिरी केली आहे. ट्रेंट बोल्टने 4 षटकात 22 धावा देत 3 बळी घेतले आहेत. त्यामुळे ट्रेंट बोल्टने या मोसमात आतापर्यंत 5 विकेट घेतल्या असून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो 5 व्या क्रमांकावर आला आहे.

पर्पल कॅपच्या शर्यतीत मुस्तफिजुर रहमान पहिल्या क्रमांकावर :

अशातच आयपीएल च्या हंगामात पर्पल कॅपच्या शर्यतीत मुस्तफिजुर रहमान अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मुस्तफिजुर रहमानने आतापर्यंत 3 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. तर मोहित शर्मा 3 सामन्यांत 6 विकेट्स घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे.

IPL 2024 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 गोलंदाज :

मुस्तफिजुर रहमान – 3 सामन्यात 7 विकेट्स
युझवेंद्र चहल – 3 सामन्यात 6 विकेट्स
मोहित शर्मा – 3 सामन्यात 6 विकेट्स
खलील अहमद – 3 सामन्यांत 5 बळी
ट्रेंट बोल्ट – 3 सामन्यात 5 विकेट्स

News Title- IPL 2024 Purple Cap List

महत्त्वाच्या बातम्या –

उद्या भारतात दिग्गज ऑटो कंपन्यांशी तगडी स्पर्धा होणार; SUV Taisor लाँच होणार

एप्रिल महिन्यात तापमान कसं असणार?, हवामान विभागाची मोठी अपडेट समोर 

जाणून घ्या IPL च्या 10 टीमचे मालक कोण आहेत? अन् त्यांची संपत्ती

मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक! हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर, रोहितच्या कृतीनं मन जिंकलं, Video

हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?