अत्यंत महत्त्वाची बातमी; एमपीएससीने घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MPSC PSI Exam | आगामी लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय एमपीएससीने (MPSC) घेतला आहे. नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे 15 ते 17 एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. पण निवडणुकीमुळे या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

19, 26 आणि 27 एप्रिल रोजी होणाऱ्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत. आता या परीक्षा 29, 30 एप्रिल आणि 2 मे रोजी होणार आहे. इतर कोणत्याही तारखांमध्ये बदल झालेला नाही. एमपीएससीकडून याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

त्यामुळे उमेदवारांची शारीरिक चाचणी 29, 30 एप्रिल 2024 व 2 मे 2024 या दिवशी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक 15 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत बदल

सदर कार्यक्रम निश्चित करताना लोकसभा निवडणूकीतील मतदानाचे टप्पे विचारात (MPSC PSI Exam) घेऊन त्या-त्या टप्प्यातील उमेदवारांना अन्य दिवशी शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. तथापि भारतीय निवडणूक आयोगाकडील प्राप्त निवेदने विचारात घेता दिनांक 19, 26 व 27 एप्रिल 2024 रोजीच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी अनुक्रमे दिनांक 29, 30 एप्रिल 2024 व 2 मे 2024 या दिवशी होतील.

शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असं एमपीएससीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर चौकशी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

वेळापत्रकात ‘असे’ झाले बदल

19 एप्रिलचा ग्राउंड 29 एप्रिलला होणार आहे.
26 एप्रिलचा ग्राउंड 30 एप्रिलला होणार आहे.
27 एप्रिलचा ग्राउंड 2 मे रोजी होणार आहे.

News Title- MPSC PSI Exam Schedule Change

महत्त्वाच्या बातम्या –

जाणून घ्या IPL च्या 10 टीमचे मालक कोण आहेत? अन् त्यांची संपत्ती

मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक! हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर, रोहितच्या कृतीनं मन जिंकलं, Video

हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?

रोहितचा फॅन थेट मैदानात शिरला; हिटमॅनलाही धक्का बसला, सर्वांची उडाली धांदल, Video

‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची घोषणाबाजी