बंगळूरुसमोर आज लखनऊचं आव्हान; कोण मारणार बाजी?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RCB vs LSG | रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आज (2 एप्रिल) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना रंगणार आहे. दोन्ही संघांना आतापर्यंत फक्त एकाच लढतीत विजय मिळवता आला असल्यामुळे दुसऱ्या विजयासाठी उभय संघ प्रयत्नशील असतील.

आजचा सामना बंगळुरूसाठी फायद्याचा ठरेल, कारण संघ घरच्या मैदानावर खेळेल. बंगळूरुचा संघ तीन सामन्यांनंतर दोन गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. गेल्या सामन्यात त्यांना कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आजच्या सामन्यात बंगळुरू विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

RCB vs LSG सामना

दुसरीकडे लखनऊ संघ दोन सामन्यांमध्ये एका विजयासह सहाव्या स्थानी आहे. बंगळूरुविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांना गुणतालिकेत बढती मिळू शकते. त्यात संघासाठी कर्णधार केएल राहुलची तंदुरुस्ती चिंतेची बाब ठरली आहे. त्याच्या अनुपस्थितीत निकोलस पूरन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे या सामन्यात राहुल कर्णधाराची भूमिका सांभाळणार का, याकडे सर्वांचं लक्ष्य राहील.

बंगळूरुकडून विराट कोहलीशिवाय इतर फलंदाजांना चमक दाखवता आलेली नाही. बंगळूरुला विजयी कामगिरी करायची झाल्यास डूप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार व कॅमेरॉन ग्रीन यांना योगदान द्यावं लागेल. त्यात गोलंदाजीतही संघाला सुधारणा करावी लागेल.

अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

RCB Predicted XI : फाफ डू प्लेसिस (C), विराट कोहली, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (WK), मयंक डागर, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशाख.

LSG Predicted XI: केएल राहुल, क्विंटन डी कॉक (WK), देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन (C), मार्कस स्टोइनिस, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, रवी बिश्नोई, मोहसीन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ.

News Title- RCB vs LSG match today IPL 2024

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक! हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर, रोहितच्या कृतीनं मन जिंकलं, Video

हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?

रोहितचा फॅन थेट मैदानात शिरला; हिटमॅनलाही धक्का बसला, सर्वांची उडाली धांदल, Video

‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची घोषणाबाजी

आचार्य चाणक्यांनी सांगितल्या प्रमाणे करा दिवसाची सुरुवात; होईल फायदाच फायदा