पुणे हादरलं! एकतर्फी प्रेमातून घडला अत्यंत भयंकर प्रकार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Crime | पुणे (Pune Crime) हे विद्येचं माहेर घर आहे. मात्र पुण्यामध्ये (Pune Crime) काही वर्षांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. याचे पडसाद हे देशभर पाहायला मिळतात. तसेच पुणे शहर (Pune Crime) हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र पुण्यामध्ये काही वर्षांमध्ये अनेक वाईट घटना घडताना दिसत आहेत. गुन्हेगारीमुळे पुणे शहर चर्चेत आलं आहे. काही दिवसांआधी पुण्यामध्ये एकतर्फी प्रेमातून दर्शना पवार हिची हत्या करण्यात आली. (Pune Crime)

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर कोयत्याने हल्ला

काही महिन्यांआधी पुण्यात पेरूगेट येथे एकतर्फी प्रेमातून तरूणाने तरूणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेथे उपस्थित असलेल्या जमावाने मध्यस्ती केल्याने तरूण तिथून निघून गेले आणि त्यामुळे ती तरूणी वाचली. पुन्हा एकदा हाच प्रत्यय पुणे शहरामध्ये घडलेला पाहायला मिळत आहे. (Pune Crime)

काय घडलं?

महेश सिद्धप्पा भंडारी (वय.22,रा. जनता वसाहत) याचे इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्या मुलीने प्रेमसंबंध संपवले होते. तरूणीने बोलणं देखील बंद केलं होतं. मात्र अशावेळी तरूणाने तिला रस्त्यात अडवलं. तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी असलेल्या महिलांनी आरडा ओरड केला. त्यावेळी दुचाकीवर असलेले तरूण पळून गेले. मात्र जाताना त्यांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. कोयता दाखवत त्या तरूणाने लोकांना धमकावलं.

कोयत्याने हल्ला करणारा तरूण तळजाई टेकडी परिसरातून पळून गेला होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती. मुलगी बोलत नसल्याने हा प्रकार केल्याचं कळतंय. त्याच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. हा प्रकार सुभाषनगर परिसरात घडल्याने सुभाषनगर परिसरामध्ये भितीचं वातावरण आहे.

यापूर्वी तरूणीवर कोयत्याने हल्ला

याआधी पुणे येथे पेरूगेट येथे एका तरूणीवर तरूणाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याठिकाणी माणसांची वर्दळ असल्याने ती तरूणी बचावली गेली. नाहीतर पुणे शहरामध्ये अनर्थ झाला असता.

यावेळी पेरूगेट येथे एकही पोलीस उपलब्ध नव्हता. त्यामुळे पुणे आयुक्तांनी काही पोलिसांचे निलंबन केलं होतं. दरम्यान पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. घरफोडी, चोऱ्या, गुन्हेगारीमध्ये पुणे शहर केवळ राज्याच्या नाहीतर देशामध्ये नावारूपाला येतं असल्याचं दिसतंय.

News Title – Pune Crime Young Boys Attack On Girls Koyta

महत्त्वाच्या बातम्या

बंगळूरुसमोर आज लखनऊचं आव्हान; कोण मारणार बाजी?

अत्यंत महत्त्वाची बातमी; एमपीएससीने घेतला मोठा निर्णय

‘या’ कारणामुळे राजकारणी लोक Iphone वापरतात; अरविंद केजरीवालांचा आयफोन चर्चेत

नाशिकच्या जागेवरून महायुतीत भूकंप होणार?; ‘हा’ नेता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

पर्पल कॅपच्या शर्यतीत युझवेंद्र चहलची धमाकेदार एन्ट्री, या टॉप 5 खेळाडूंमध्ये रस्सीखेच सुरु