अभिनेता रणबीर कपूरचा मोठा खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ranbir Kapoor | अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट त्यांचे सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. त्यांना राहा नावाची एक गोंडस मुलगीही आहे. नुकतंच रणबीर आणि त्याची आई नीतू सिंह यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यात रणबीरने आलियासोबतच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.

‘जूता चुराई’नंतर आलियाच्या बहिणींनी रणबीरकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती, असं म्हटलं जात होतं. त्यावर रणबीरने मोठा खुलासा केला. 30 मार्चपासून नेटफ्लिक्सवर लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ स्ट्रीम होत आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये रणबीर कपूरने त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनीसोबत हजेरी लावली.

रणबीर कपूरचा मोठा खुलासा

या पहिल्याच एपिसोडमध्ये रणबीरला त्याच्या लग्नाविषयी अनेक सवाल करण्यात आले. त्याने आलिया भट्टच्या बहिणींना ‘जुता चुराई’नंतर किती रुपये दिले होते, असा प्रश्न कपिलने विचारला होता. यावर रणबीरने दिलेल्या उत्तरामुळे सर्वच खळखळून हसले.

रणबीर आणि आलिया यांनी घरातच मोजके पाहुणे आणि जवळचे काही मित्र-मंडळी यांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यांच्या लग्नादरम्यान रणबीरने आलियाच्या बहिणींना चप्पल लपवण्याच्या विधीसाठी 11 कोटी रुपये दिले होते, अशा खूप चर्चा रंगल्या होत्या. याबाबत आता स्वतः रणबीरने (Ranbir Kapoor) खुलासा केलाय.

रणबीरची कपिल शर्मा शोमध्ये हजेरी

“तू खरंच आलियाच्या बहिणींना 11-12 कोटी रुपये दिले होते का”, असा सवाल कपिलने रणबीरला यावेळी केला. यावर रणबीर म्हणाला की, “नाही, हे खरं नाही.आलियाच्या बहिणींनी माझ्याकडून काही लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र ते कमी करून मी त्यांना काही हजार रुपयांपर्यंतची कॅश दिली होती.”, असं रणबीर म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

हे ऐकताच अर्चना पुरण सिंह यांनी थक्क होऊन लगेच “हजारांमध्ये? इतकं कमी?”, असा सवाल केला. तेव्हा रणबीर (Ranbir Kapoor) सांगतो, “हो, आमचं लग्न घरीच झालं होतं. त्यामुळे चप्पल लपवली असती तरी ती घरातच असती.” हे ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

News Title- Ranbir Kapoor Big reveal about his wedding ceremony with Alia

 महत्त्वाच्या बातम्या –

वानखेडेवर MI vs RR; मुंबई विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक

भन्नाट फीचर्ससह Realme कंपनीचा स्मार्टफोन लाँच; Samsung ला मागे टाकणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; LPG सिलेंडर ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त

‘या’ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल, वाचा राशीभविष्य

CSK ची हार पण धोनीचा भारी ‘पंच’, चाहत्यांचा एकच जल्लोष; ठरला ऐतिहासिक सामना