Bharti Hexacom IPO l आज IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल समूहाच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ आज बाजारात येणार आहे. जर तुम्ही देखील IPO मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही यामध्ये पैसे गुंतवून चांगले उत्पन्न मिळवू शकता. एअरटेलची उपकंपनी Hexacom चा IPO आज उघडणार आहे. कंपनी या IPO द्वारे 4,275 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. तर आज आपण या IPO संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
14092 रुपयांची किमान गुंतवणूक करावी लागणार :
Bharti Hexacom IPO साठी तुम्हाला किमान रु. 14092 ची गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला या IPO च्या एका लॉट साइजमध्ये 26 शेअर्स मिळतील. तसेच या IPO मध्ये तुम्ही कमाल 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
IPO कधी उघडणार? – 3 एप्रिल 2024
IPO कधी बंद होणार? – 5 एप्रिल 2024
इश्यूची किंमत किती असणार? – 542 ते 570 रुपये
लिस्टिंग तारीख काय असणार? – 12 एप्रिल 2024
सूची कुठे होईल – BSE आणि NSE
इश्यू आकार किती असणार? – रु 4275 कोटी
दर्शनी मूल्य किती असणार? – 5 रुपये
Bharti Hexacom IPO l कंपनीचा व्यवसाय काय आहे? :
मात्र गुंतवणूकदारांना या IPO मध्ये गुंतवणूक करण्याआधी Bharti Hexacom IPO कशासंदर्भात आहे व त्याचा व्यवसाय आहे हे माहित असणारे गरजेचे आहे. भारती हेक्साकॉम ही कंपनी सोल्युशन प्रोव्हायडरशी संबंधित आहे. हे देशाच्या विविध भागांमध्ये दूरसंचार सेवा प्रदान करते.
कंपनीचा सध्या राजस्थान, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरासह अनेक राज्यांमध्ये व्यवसाय आहे. जर आपण सध्या कंपनीच्या जास्तीत जास्त ग्राहकांबद्दल बोललो तर ते राजस्थानमध्ये असल्याचे समोर आले आहे.
News Title – Bharti Hexacom IPO Opens From Today
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर
रवि राणांचा बच्चू कडूंवर पलटवार, थेट डोनाल्ड ट्रम्पशी केली तुलना, म्हणाले…
“रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार करा”
“तो डाव अशोक चव्हाण यांचाच”; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ
निवडणूक काळात WhatsApp मेसेज पाठवताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्यावर होऊ शकते कारवाई