“तो डाव अशोक चव्हाण यांचाच”; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ashok Chavan |  राज्याचं लक्ष लोकसभा निवडणुकीकडं लागलं आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. काही दिवसांआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये काय राहिलं आहे, असं म्हणत काँग्रेसची खिल्ली उडवली होती. त्यावर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर नाना पटोले आले असताना त्यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसवर बोलायचं नाही. त्यावर त्यांना बोलायचा अधिकार नाही. त्यांच्या भोकर मतदारसंघामध्ये लोक त्यांना प्रचारासाठी येऊन देत नाही हे आपण पाहत आहोत. त्यामुळे काँग्रेसवर बोलणं त्यांनी टाळावं”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

“काँग्रेसच्या नावाने खूप कमावलं तुम्ही. काँग्रेसच्या नावानं तुम्ही राजयोग भोगला. काँग्रेसला कसं संपवायचं याचा प्लॅन केला होता. बरं झालं आज ते आमच्यात नाहीत”, असं म्हणत नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला आहे.

“ज्या आईने तुम्हाला मोठं केलं…”

“काँग्रेसवर बोलणं आता टाळलं पाहिजे ज्या आईने तुम्हाला मोठं केलं. ज्या आईने तुम्हाला नाव दिलं, त्याच आईची तुम्ही बदनामी करायला निघाला असाल तर लोकं तुम्हाला माफ करणार नाही”, असं नाना पटोले म्हटलंय.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्ला

“आम्ही प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चेत पुढे गेलो होतो. मतांचं विभाजन होऊ नये असं वाटत होतं. पण त्यांनी आमची वारंवार चेष्टा केली. अडीच – तीन महिने तुमच्याच मीडियावर ती दाखवली होती. तरीही मी काँग्रेसच्या हायकमांडला समजून सांगितलं. मात्र त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यापद्धतीने उमेदवार उभे करायचे काम केलं याचा अर्थ त्यांना मैत्री करायची नव्हती”, असं नाना पटोलेंनी म्हणाले आहेत.

News title – Ashok Chavan Plan Was to End Congress Say nana patole

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरलं! एकतर्फी प्रेमातून घडला अत्यंत भयंकर प्रकार

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार

अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढल्या; मतदारसंघातील ‘त्या’ बॅनरने खळबळ

तणाव दूर करण्यासाठी रामबाण उपाय, ‘असा’ करा लाईफस्टाइलमध्ये बदल

तुम्हाला घर बांधण्यासाठी सरकारकडून मिळणार पैसे, या योजनेत अर्ज करा