निवडणूक काळात WhatsApp मेसेज पाठवताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्यावर होऊ शकते कारवाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

WhatsApp News | भारतात लोकसभा निवडणूक होत आहे, त्यासंदर्भात आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे. आचारसंहितेचं काटेकोर पालन करणं राजकीय पक्ष, उमेदवार तसेच सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा बंधनकारक आहे. आचारसंहितेचा भंग केला तर निवडणूक आयोग याप्रकरणी थेट तुमच्यावर सुद्धा कारवाई करु शकतो. त्यामुळे यासंदर्भात काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

डिजीटल युग सुरु झाल्यानंतर सोशल मीडियामार्फत निवडणुकीचा प्रचार-प्रसार करण्याचं तंत्र वाढलं आहे. सर्वच राजकीय पक्ष तसेच नेते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. WhatsApp हे त्यापैकीच एक मेसेजिंग माध्यम आहे. मात्र बदलत्या काळानूसार WhatsApp सुद्धा बदलले असून त्यात ग्रुप्स तसेच चॅनेल्स सुरु करण्याची सुविधा आहे. (WhatsApp News) यामध्ये लोकांचे समूह एकत्र असतात आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा तसेच माहितीची देवाणघेवाण करत असतात. हेच करत असताना आपल्या हातून आचारसंहितेचा भंग होण्याची शक्यता असते.

WhatsApp ग्रुप अॅडमीनने घ्यायची काळजी-

तुम्ही जर एखाद्या WhatsApp Groupचे अॅडमीन असाल तर तुम्ही आजच सावध होण्याची गरज आहे. आपल्या ग्रुपवर काय शेअर होते आणि काय नाही?, याची काळजी घेणे सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. चुकीच्या गोष्टी जर ग्रुपवर शेअर होत असतील तर त्या गोष्टी आचारसंहितेच्या कचाट्यात सुद्धा अडकू शकतात. त्यामुळे चुकीच्या गोष्टी पाठवणाऱ्यांना प्रतिबंध करणे गरजेचे आहे. नाहीतर याद्वारे WhatsApp Admin वर थेट कायदेशीर कारवाई होऊ शकते.

कोणत्या गोष्टींची शहानिशा करणे गरजेचे आहे, यामध्ये प्रामुख्याने प्रचाराशी संबंधित साहित्य आणि खोट्या बातम्या यांचा प्राधान्याने उल्लेख करणे गरजेचे आहे. जातीय तसेच वांशिक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवू नये,  हिंसात्मक तसेच अश्लील साहित्य पसरवू नये, कुणाचेही खासगी फोटो तसेच व्हिडीओ त्यांच्या परवानगीशिवाय पसरवू नये. (WhatsApp News) लक्षात ठेवा चुकीच्या गोष्टी तुमच्या ग्रुपद्वारे पसरवल्या जात असतील तर थेट कारवाई होऊ शकते. तसेच तुम्ही ग्रुप अॅडमीन नसाल पण मेसेज फॉरवर्ड करणारे असाल तर तुमच्यावरही कारवाई होऊ शकते.

सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सवर सुद्धा नजर-

सध्या आपल्याकडे सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स नावाचा एक प्रकार सुरु झाला आहे. या लोकांवर सुद्धा निवडणूक आयोगाची नजर असणार आहे. लोकसभा निवडणुकीला उभा राहणाऱ्या उमेदवाराला आपल्या प्रचार खर्चाचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. काही उमेदवार अशाप्रकारे सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सकडून प्रचार करुन घेऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रचारावर सुद्धा आयोगाची नजर असणार आहे.

सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सने त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा इतर माध्यमांवर व्हिडीओ बनवताना किंवा पोस्ट करताना सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सने कायद्याच्या कचाट्यात सापडतील अशा गोष्टी करणं टाळायला हवं. नाहीतर चुकीच्या गोष्टी केल्या तर निवडणूक आयोगाच्या कारवाईचा बडगा तुमच्यावर सुद्धा पडू शकतो. यासंदर्भात आपली तक्रार जाणार नाही, असा कुणाचा भ्रम असेल तर अशा भ्रमात राहू नका कारण निवडणूक आयोगाने सर्वसामान्यांना तक्रार करण्यासाठी ऑनलाईन अॅप तसेच वेबसाईटवर सोय उपलब्ध करुन दिलेली आहे, त्यामुळे एक तक्रार आली तरी तुमची चौकशी होऊ शकते आणि दोषी आढळल्यास कारवाई सुद्धा होऊ शकते.  (WhatsApp News)

News Title: WhatsApp News Admin imp update

महत्त्वाच्या बातम्या-

गरम होतंय म्हणून उर्फीने सगळ्यांसमोर केलं ‘हे’ कृत्य; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

सिंहाकडून शिका ‘या’ गोष्टी, येईल भरपूर संपत्ती

अभिनेता रणबीर कपूरचा मोठा खुलासा!

पुणे हादरलं! एकतर्फी प्रेमातून घडला अत्यंत भयंकर प्रकार

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार