पुण्यातील ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुण्यातील ससून रुग्णालय काही दिवसांपू्र्वी ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलं होतं. पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयात गेल्या 10 दिवसांपासून एक रुग्ण उपचार घेत होता. सुरु असलेल्या उपचाराचा फायदा होत नसल्याने त्याला काही दिवसांपूर्वी आयूसीमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. परंतू त्याच्या मृत्यूचं कारण ऐकून सगळीकडे एकच खळबळ उडाली. उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याने सगळीकडे चर्चा सुरु झाली.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील (Pune News) ससून रुग्णालयात घडलेल्या प्रकारावरुण सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं. रुग्णालयात उपचार घेत असताना रुग्णाला उंदीर चावला आणि त्याचा मृत्यू झाल्याचं समजल्यावर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डाॅक्टरांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. सागर रेणूसे असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. या प्रकारामुळे ससून रुग्णालयाचं नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भोर येथे सागरचा आपघात झाला होता. आपघातानंतर त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र त्याच्यावर कोणतेच उपचार होत नव्हते. काही दिवसांपूर्वी सागरची प्रकृती खालावली होती.

पुढे काय घडलं?

दरम्यान, सागरला आयसीयू येथे हलवण्यात (Pune News) आल्यानंतर त्याचावर उपचार सुरु होते. या वेळी सागरला उंदीर चावला आणि सगळीकडे खळबळ उडाली. त्यानंतर नेमकं काय झालं याचा शोध घेतला असता. उंदीर चावल्याचं समोर आलं. हा प्रकार पाहून नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. आय सी यु मध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन आज सकाळी त्याचं निधन झालं.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार-

रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत रुग्णालय प्रशासनावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतली आहे. त्यानंतर डाॅक्टरांना विचारल्यास डाॅक्टरांनी नकार दिला. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी सागर रेणुसेच्या शरीरावर उंदीर चावल्याचं मान्य केलं आहे.

News Title : Pune news patient dies due rat bite

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला मोठा धक्का?; ‘हा’ बडा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार?

गरम होतंय म्हणून उर्फीने सगळ्यांसमोर केलं ‘हे’ कृत्य; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

सिंहाकडून शिका ‘या’ गोष्टी, येईल भरपूर संपत्ती

अभिनेता रणबीर कपूरचा मोठा खुलासा!

पुणे हादरलं! एकतर्फी प्रेमातून घडला अत्यंत भयंकर प्रकार