भाजपला मोठा धक्का?; ‘हा’ बडा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jalgaon Lok Sabha Election | जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha Election) मतदारसंघामध्ये मोठा ट्वीस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते उन्मेश पाटील यांचं भाजपने तिकीट कापलं आहे. यामुळे उन्मेश पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तसेच ते आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहे.

उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. यामुळे आता उन्मेश पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

उन्मेश पाटील हे जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha Election) मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे खासदार आहेत. त्यांनी याआधी 2014 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार होते. त्यांनी पुन्हा एकदा जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha Election) मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा दाखवली होती. मात्र स्मिता वाघ यांना जळगावमध्ये लोकसभा (Jalgaon Lok Sabha Election) निवडणूक लढण्याची संधी दिली आहे.

“उन्मेश पाटील संजय राऊत यांचे मित्र”

स्मिता पाटील यांनी संजय राऊत आणि उन्मेश पाटील यांच्याबाबत दावा केला आहे. उन्मेश पाटील हे संजंय राऊत यांचे मित्र असल्याचा दावा केला आहे.  “ते एक भेट घेण्यासाठी संजय राऊत यांच्याकडे गेले असतील. ते पक्षामध्ये प्रचार करणार नाही अशी कोणतीही बातमी माझ्यापर्यंंत पोहोचली नाही,”

“पाठीशी जनता उभी राहील”

“कोणी कसं जीवन जगावं हा त्याच्या जीवनाचा प्रश्न आहे, पण आजपर्यंत मी जीवनाशी वैयक्तिक तडजोड केली आहे. एकनिष्ठ राहिले. त्यामुळे पक्षासोबत एकनिष्ठ राहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्तीच्या पाठीशी जनता ही उभी राहील”, असं स्मिता पाटील म्हणाल्या आहेत.

“फोटो असणं किंवा नसणं त्यामुळे तुमचं कधी काही कमी होत नाही. फोटोसाठी आम्ही कधी अडून राहिलो नाही. फोटोवरून कधी तुमचं मूल्यमापन होत नसतं. तुमच्या कामावरून तुमचं मूल्यमापन होत असतं,” अशी प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी दिली आहे.

News title – Jalgaon Lok Sabha Election Update unmesh Patil

महत्त्वाच्या बातम्या

अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढल्या; मतदारसंघातील ‘त्या’ बॅनरने खळबळ

तणाव दूर करण्यासाठी रामबाण उपाय, ‘असा’ करा लाईफस्टाइलमध्ये बदल

तुम्हाला घर बांधण्यासाठी सरकारकडून मिळणार पैसे, या योजनेत अर्ज करा

…म्हणून रेखाच्या नवऱ्याने केलेली सुसाईड; रेखाच्या लाईफबद्दल मोठा खुलासा

“एक गोष्ट कायम लक्षात ठेवा…”, पराभवानंतर हार्दिकची पोस्ट चर्चेत