…म्हणून रेखाच्या नवऱ्याने केलेली सुसाईड; रेखाच्या लाईफबद्दल मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Actress Rekha | 70 च्या दशकातील अभिनेत्री रेखा आजही भल्या भल्या अभिनेत्रींना त्यांच्या सौंदर्याने आणि अदांनी मागे टाकतात. रेखा अजूनही चित्रपट सृष्टीत सक्रिय आहेत. तसंच अनेक कार्यक्रमात त्या सहभागी होताना दिसून येतात. त्यांची रिअल लाईफही चित्रपटाच्या कथानका इतकीच रंजक राहिली आहे.

एका विवाहित अभिनेत्यासोबतच्या त्यांच्या अफेअरच्या कहाण्या इतक्या लोकप्रिय होत्या की त्या आजही स्मरणात आहेत. रेखा यांनी एका मोठ्या उद्योजकाशी लग्न केलं होतं. पण लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यांनंतर ते वेगळे झाले.

अभिनेत्री रेखा यांनी 15 एप्रिल 1990 रोजी मुंबईतील जुहू येथील मुक्तेश्वर देवालय मंदिरात दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवालसोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या काही दिवसांतच रेखा यांना पतीबद्दल काही गोष्टी समजल्या. यामुळे त्यांच्यात सतत वाद-विवाद व्हायचे.

रेखाच्या नवऱ्याने का केली आत्महत्या?

रोजच्या भांडणामुळे अखेर रेखा यांनी मुकेश अग्रवालपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ही बातमी रेखाचा पती मुकेशपर्यंत पोहोचली तेव्हा हा धक्का सहन करू शकला नाही आणि लग्नाच्या 6 महिन्यांनंतर त्यांनी रेखा यांच्याच ओढणीला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर, काही रिपोर्टनुसार व्यवसायात नुकसान झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातं. या दरम्यान त्यांनी एक सुसाईड नोटदेखील लिहिली होती.

या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मुलांची देखभाल त्यांच्या मानसोपचार तज्ज्ञाने करावी असं म्हटलं होतं. यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर एक पुस्तकही लिहिलं आहे. त्यानुसार मुकेश अग्रवाल यांनी आपल्या संपत्तीमधील एक पैसाही रेखाला मिळणार नसल्याचं म्हटलं होतं. कारण, रेखा स्वत: कमाई करण्यास समर्थ असल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

रेखा आणि अमिताभ यांचं नातं

रेखा यांचं नाव अमिताभ बच्चन यांच्याशीही जोडलं जातं. दोघे बरीच वर्ष नात्यात होते. मात्र, अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी विवाह करत संसार थाटला. अजूनही त्यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा रंगत असते. रेखा यांचं नाव विनोद मेहरा यांच्याशीही जोडलं गेलं होतं. पण, त्यांनी ही अफवा असून आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचं म्हटलं होतं.

News Title – Actress Rekha Married Life

महत्त्वाच्या बातम्या- 

आंबा खात असाल तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा…

अजित पवार यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर!

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; PF नियमांत झाला मोठा बदल

“2 कोटींची गाडी अन् 17 रूपयांची साडी…,”; बच्चू कडू नवनीत राणांवर संतापले

जेईई परीक्षा 2024 प्रवेशपत्र जारी; परीक्षेला जाण्यापूर्वी ‘हे’ मार्गदर्शक तत्त्वे नक्की वाचा